शालेय अभ्यासक्रमांच्या सर्व पुस्तकात ‘क्यू.आर.’ कोड, आता वर्गात शिक्षकांना भ्रमणध्वनी गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:07 PM2018-04-13T12:07:23+5:302018-04-13T12:07:23+5:30

अभ्यासक्रमात झाला कृतीयुक्त बदल

'QR' code in all books of school | शालेय अभ्यासक्रमांच्या सर्व पुस्तकात ‘क्यू.आर.’ कोड, आता वर्गात शिक्षकांना भ्रमणध्वनी गरजेचा

शालेय अभ्यासक्रमांच्या सर्व पुस्तकात ‘क्यू.आर.’ कोड, आता वर्गात शिक्षकांना भ्रमणध्वनी गरजेचा

googlenewsNext
ठळक मुद्देक्यू.आर. कोडने प्रशिक्षणात हजेरीक्यू.आर. कोड स्कॅन करून हजेरी नोंदविण्याचा राज्यातील पहिला प्रयोग अमळनेरात

संजय पाटील / आॅनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. १३ - बदललेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनाही तंत्रस्नेही व्हावे लागणार असून सर्व इयत्तेच्या सर्व विषयांच्या पुस्तकात क्यू.आर. कोडचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार शिक्षकांना भ्रमणध्वनी गरजेचा झाला आहे.
शासनाने गेल्या वर्षांपासून एक एक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणे सुरू केले असून यंदा दहावी, आठवीची पुस्तके बदलण्यात आली आहेत. कृतीयुक्त स्वयं अध्ययनवर भर देण्यात आला असून तालुका पातळीवर शिक्षकांना अध्ययन व अध्यापन याविषयी राज्यपातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहेत. यामुळे शिक्षकांनाही आधुनिक तसेच कृतीयुक्त व तंत्रस्नेही व्हावे लागणार आहे
अमळनेर येथील तालुका पातळीवर गणित प्रशिक्षणात शिक्षकांची प्रथमच क्यू.आर. कोड भ्रमाणध्वनीवरून स्कॅन करून हजेरी नोंदविण्यात आली. गणित सुलभक डी. ए. धनगर यांनी क्यू.आर. कोड जनरेट केला होता. तालुका पातळीवरील हा राज्यात पहिला प्रयोग होता. हजेरीच्या माध्यमातूनच शिक्षकांना याद्वारे तंत्रस्नेही करण्याचा प्रयत्न झाला.
भ्रमणध्वनी न वापरण्याचा नियम शिथिल करावा लागणार
क्यू.आर. कोड स्कॅन केल्यानंतर त्या त्या विषयाच्या विविध लिंक ओपन होऊन पुस्तकाव्यतिरिक्त सर्व माहिती उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षकांना भ्रमणध्वनी वर्गात शिकवताना वापरवाच लागेल व शिक्षकांना संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आणि अतिरिक्त माहिती मिळून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास उपयोगी ठरणार आहे. यामुळे शिक्षकांना वर्गामध्ये भ्रमणध्वनी वापरू नका हा नियम शिथिल करावा लागणार असून भ्रमणध्वनी आवश्यक झाले असून वर्गात शिकविताना अतिरिक्त ज्ञानासाठी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून क्यू.आर.कोड चा वापर करावा लागणार आहे. अनेक शिक्षक अद्याप कोड स्कॅनर बाबत अनभिज्ञ आहेत.
अमळनेर तालुका प्रशिक्षणात राज्य पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शक डी. ए. धनगर, संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. महाजन, विषय तज्ज्ञ प्रमोद पुनवटकर, वानखेडे यांनीही मार्गदर्शन केले. नव्या अभ्यासक्रमात शासनाने जीएसटी कर लागू केल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच दहावी गणितात जीएसटी प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेमका जीएसटी काय आहे हे सर्वांना सविस्तर कळणार आहे. शिबिरास मुख्यध्यापक सतीश देशमुख, मुख्याध्यापक अनिता बोरसे, मुख्यअध्यपक राजेंद्र पाटील , मुख्यअध्यापक आर.पी. मुसळे , बेहरे, पी. डी. पाटील, के.यू. बागूल, निरंजन पेंढारे, सुनील पाटील, दीपक महाजन, गोपाळ हडपे, ए. पी. वाणी, आर. ए. शिंदे हजर होते.

Web Title: 'QR' code in all books of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.