रॅली व पथनाट्य सादर करुन चोपड्यात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:25 AM2018-12-03T00:25:46+5:302018-12-03T00:29:31+5:30

जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त चोपडा तालुक्यात ठिकठिकाणी रॅली, पथनाट्य आदी ंद्वारे जनजागृती करण्यात आली. यात शाळांमधील विद्यार्थ्यानी विशेषत्वाने सहभाग नोंदविला.

 Public awareness in Chopda by presenting rallies and street plays | रॅली व पथनाट्य सादर करुन चोपड्यात जनजागृती

रॅली व पथनाट्य सादर करुन चोपड्यात जनजागृती

Next
ठळक मुद्देचोपड्यात निघालेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी दिल्या जोरदार घोषणा वेळोदे येथे पथनाट्यातून जागृती

चोपडा/वेळोदे: १ डिसेंबर जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आॅर्किड इंटरनॅशनल स्कूलतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटील, डॉ. तृप्ती पाटील, व्ही.के. पाटील(नंदुरबार), प्राचार्या परमेश्वरी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
शाळेपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले. विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध पोस्टर्सच्या माध्यमातून लोकांची मने आकर्षित केली.
विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये एड्स या आजारविषयी व काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणा देऊन सगळ्यांना आजच्या दिवसाचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रत्येकाला जागतिक एड्स दिनानिमित्त विचार करायला भाग पाडले.
वेळोदे येथे व्यसन मुक्तीवर पथनाट्य
वेळोदे ता. चोपडा- येथे व्यसन मुक्ती अभियानांतर्गत पथ नाट्य सादर करण्यात आले.
घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ विद्यालयाचे चेअरमन चंद्रहास गुजराथी व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक आर. पी. चौधरी, पर्यवेक्षक एस. बी. अहिरराव व शिक्षक यांच्या मदतीने ८ वी ते १० वी च्या बाल कलाकारांनी व्यसन मुक्ती अभियान पथनाट्याने वेळोदे गावातील ग्रामस्थाना मंत्रमुग्ध केले. बीडी, सिगारेट, दारु,तंबाखू, गुटखा, आदी मादक पदार्थ कसे घातक आहे हे नाटीकेतून पटवून दिले. विशेष म्हणजे ही नाटिका शुक्रवारी दुपारी ४ वाजता वेळोदे गावात सादर करण्यात आली. यावेळी सरपंच मनीषा बोरसे, रवींद्र बोरसे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. व्यसन मुक्ती अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छता अभियान, घर घर शौचालय, स्कूल चले हम, यासारखे उपक्रम घोडगाव, वेळोदे, कुसुंबे,अनवर्दे ,अनेर, गलंगी या परिसरात राबविण्याचा मानस मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केला. प्रस्तावना व आभार शिक्षिका मिनाक्षी जैन यांनी मानले.

Web Title:  Public awareness in Chopda by presenting rallies and street plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.