जळगाव महानगरपालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:43 PM2018-06-25T14:43:38+5:302018-06-25T15:01:16+5:30

जळगाव, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ आॅगस्ट २०१८ रोजी मतदान होणार आहे.

Polling for Jalgaon Municipal Corporation 1st August | जळगाव महानगरपालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान

जळगाव महानगरपालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान

Next
ठळक मुद्दे१ आॅगस्ट २०१८ रोजी मतदान होणारसांगली-मिरज-कुपवाड मनपांचा समावेशवसई-विरार महानगरपालिकेच्या एका रिक्त पदासाठी देखील मतदान

जळगाव : जळगाव, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ आॅगस्ट २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ आॅगस्ट २०१८ रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत दि. १३ आॅगस्ट २०८८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ असून मतदारांची संख्या सुमारे ४ लाख २३ हजार ३६६ इतकी आहे. एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३९ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११ , अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवगार्साठी २१ जागा राखीव आहेत.
जळगाव महानगरपालिकेची मुदत १९ सन २०१८ सप्टेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ४ लाख ६० हजार ११८ असून मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार १५ इतकी आहे. एकूण १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३८ जागा राखीव आहेत.अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी ४ , तर नागरिकांच्या मागासप्रवगार्साठी २० जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे: 4 ते 11 जुलै 2018

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 12 जुलै 2018

उमेदवारी मागे घेणे: 17 जुलै 2018 पर्यंत

निवडणूक चिन्ह वाटप: 18 जुलै 2018 

मतदान: 1 ऑगस्ट 2018

मतमोजणी: 3 ऑगस्ट 2018

निकालाची राजपत्रात प्रसिध्दी:6 ऑगस्ट 2018 पर्यंत

 

Web Title: Polling for Jalgaon Municipal Corporation 1st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.