दर्जा तपासणीनंतर पोषण आहार कु:हा जि.प.शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 05:00 PM2017-07-17T17:00:31+5:302017-07-17T17:00:31+5:30

कु:हा जि.प.शाळेत बदलून देण्यासाठी आला होता आहार : खाजगी चारचाकीने आणला माल

Nutrition Conservation After Quality Checking: It is in ZP School | दर्जा तपासणीनंतर पोषण आहार कु:हा जि.प.शाळेत

दर्जा तपासणीनंतर पोषण आहार कु:हा जि.प.शाळेत

Next

ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.17 - भुसावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जि. प. शाळांमधील  विद्याथ्र्याना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ठ दर्जाचा जात असल्याची तक्रार होत असताना आज कु:हे (पानाचे) येथील जि.प.शाळेत बदलून देण्यासाठी आणलेल्या पोषण आहाराची तपासणी करण्यात आली. 
सोमवारी 17 जुलै रोजी शाळेला मिळणा:या शालेय  पोषण आहारामधील  वाटाणा व मूगदाळ  बदलून देण्यासाठी शालेय पोषण आहार पुरवणारे मक्तेदार राजू माळी त्यांच्या स्वत:च्या चारचाकी वाहनात (एमएच-04-बीके-3481)   पोषण आहार ठेऊन आले होते.
दरम्यान, आणलेला शालेय पोषण आहार चांगल्या दर्जाचा आहे वा नाही याची तपासणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली. त्यांनी पोषण पाहून व तो चांगला असल्याचे आढळल्याने समाधान व्यक्त केल्याची माहिती मुख्याध्यापकांनी कळविली. प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साधना प्रमोद सपकाळे, सुनंदा वामन वराडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उत्तम काळे, भाजपा तालुका सरचिटणीस नारायण कोळी उपस्थित होते.

Web Title: Nutrition Conservation After Quality Checking: It is in ZP School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.