नेताजी पालकर चौक मित्र मंडळाचे गोविंदा पथक ठरले चाळीसगावच्या मानाच्या दहीहंडीचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:56 PM2018-09-04T13:56:46+5:302018-09-04T13:57:08+5:30

३३,३३३ रुपयांच्या बक्षीसाचा रोवला मानाचा तुरा

Netaji Palkar Chowk Mitra Mandal's Govinda team gets honorary Dahihandi man in Chalisgaon | नेताजी पालकर चौक मित्र मंडळाचे गोविंदा पथक ठरले चाळीसगावच्या मानाच्या दहीहंडीचे मानकरी

नेताजी पालकर चौक मित्र मंडळाचे गोविंदा पथक ठरले चाळीसगावच्या मानाच्या दहीहंडीचे मानकरी

googlenewsNext

चाळीसगाव, जि. जळगाव - शहरात वीर सावरकर चौकात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मानाच्या दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. यंदाचे हे सलग ७ वे वर्ष असून या वर्षी देखील मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातील नेताजी पालकर मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने ताल धरत दहीहंडीचा मान पटकाविला तर इतर सर्व पथकांचे प्रात्यक्षिक नेत्रदीपक राहिले. ढोलताशांच्या गजरात तरुणाई थिरकली होती तर स्वरबद्ध गाण्यांच्या गीतांवर तहसिल परिसर निनादून गेला होता. यात शहरातील महावीर व्यायाम शाळा मित्र मंडळ, नेताजी पालकर चौक मित्र मंडळ,जिद्दी गृप,सिदाजी आप्पा गृप मंडळानी सहभाग घेतला होता सर्वत्र डीजेच्या तालावर गोविंदा पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख , व्यापारी देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, तहसीलदार कैलास देवरे,माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प.सद्स्य अतुल देशमुख, भूषण पाटील, माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, प्रदीप निकम, रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष डॉ.प्रमोद सोनवणे, पं.स.सदस्य अजय पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, सुरेश चौधरी, दीपक पाटील, सुर्यकांत ठाकूर, प्रशांत पाटील, प्रदीप राजपूत, फकिरा बेग, सदाशिव गवळी, मिलिंद शेलार, जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, चितेगांवचे सरपंच अमोल भोसले, रिकी मोरपाणी, गोकुळ कोल्हे, भूषण शिंगटे, डॉ.मुकुंद पाटील, नीलेश हमलाई आदी उपस्थित होते.

Web Title: Netaji Palkar Chowk Mitra Mandal's Govinda team gets honorary Dahihandi man in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.