मुक्ताई साखर कारखाना शेतकऱ्यांना १८०० रुपये भाव देणार -माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:05 AM2018-10-30T01:05:53+5:302018-10-30T01:07:12+5:30

शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त म्हणजे १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याचे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी मुक्ताई शुगर अ‍ॅॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या पाचव्या गाळप हंगामप्रसंगी जाहीर केले.

Mukutai sugar factory to give Rs 1800 to farmers for the price - Minister of Finance, Mr. Eknathrao Khadse | मुक्ताई साखर कारखाना शेतकऱ्यांना १८०० रुपये भाव देणार -माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची घोषणा

मुक्ताई साखर कारखाना शेतकऱ्यांना १८०० रुपये भाव देणार -माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त भाव देणारजास्तीत-जास्त शेतकºयांनी ऊस लागवड करावी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त म्हणजे १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याचे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी मुक्ताई शुगर अ‍ॅॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या पाचव्या गाळप हंगामप्रसंगी जाहीर केले. जास्तीत-जास्त शेतकºयांनी ऊस लागवड करावी, असेही आवाहनही त्यांनी केले.
या वेळी मध्य प्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे प्रमुख अतिथी होते. या मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
प्रमुख अतिथी म्हणून महानंदच्या अध्यक्षा मंदा खडसे, खासदार रक्षा खडसे, आ.हरिभाऊ जावळे, आ.संजय सावकारे, बुलडाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष मोहमद हुसैन खान, कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव, डॉ.प्रांजल खेवलकर, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्षा नजमा तडवी, अनिता येवले, रमण भोळे, महानंदा होले, सभापती पं.स.सभापती शुभांगी भोलाने, गणेश पाटील, माधुरी नेमाडे, जि.प.सदस्य कैलास सरोदे, भानुदास गुरचळ, रंजना पाटील, वर्षा पाटील, वनिता गवळे, जयपाल बोदडे, नीलेश पाटील, वैशाली तायडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, योगेश कोलते, संदीप देशमुख नारायण चौधरी, पांडुरंग नाफडे, भोसले, गोपाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्ताविक माजी सभापती विलास धायडे व सूत्रसंचालन सुनील नेवे व आभार निवृत्ती पाटील यांनी मानले.पहिले पाच ऊस पुरवणाºया शेतकºयाचा तसेच जास्त उत्पादन घेणाºया शेतकºयांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहमद हुसेनखान हे आज व्यासपीठावर उपस्थित होते.


 

Web Title: Mukutai sugar factory to give Rs 1800 to farmers for the price - Minister of Finance, Mr. Eknathrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.