प्रेमीयुगुलाचे विषप्राशन, ‘तिचा’ मृत्यू तर ‘त्याची’ मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:43 AM2019-03-11T00:43:36+5:302019-03-11T00:44:15+5:30

जामनेर तालुक्यातील रहिवासी

Love poisoning of lover, 'her' death, and 'her' fight with death | प्रेमीयुगुलाचे विषप्राशन, ‘तिचा’ मृत्यू तर ‘त्याची’ मृत्यूशी झुंज

प्रेमीयुगुलाचे विषप्राशन, ‘तिचा’ मृत्यू तर ‘त्याची’ मृत्यूशी झुंज

Next

वाकोद, ता. जामनेर - प्रेमप्रकरणातून विषप्राशन करून जामनेर तालुक्यातील प्रेमी युगलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास फर्दापूर, ता.सोयगावनजीक असलेल्या वरखेड तांडा येथील एका शेतात घडली. यातील अश्विनी प्रवीण पाटील (२१, रा.मोयगाव भागदरा, ता.जामनेर) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दीपक भगवान लोखंडे (२७, रा.मोयगाव भागदरा, ता.जामनेर) हा तरुण गंभीर असून त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार १० रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास फर्दापूर शिवारातील काळापट्टा परिसरातील दारासिंग चव्हाण यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली प्रेमी युगल विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. या विष़यी माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो.ना. सुनील भिवसने व परिसरातील शेतकऱ्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अश्विनी प्रवीण पाटील हिचा जागीच मृत्यू झालेला होता तर तरुण दीपक भगवान लोखंडे हा गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडलेला आढळून आला. त्यांच्या बाजूला आढळलेल्या बॅगमधील आधार कार्ड व कागदपत्रांवरुन दोघांची ओळख पटली.
पोलिसांनी तातडीने बेशुद्ध अवस्थेतील दीपक लोखंडे यास वैद्यकीय उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्रथोमोपचार करुन त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. मयत अश्विनी पाटील हिचे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

प्रेमी युगलाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी प्रेम प्रकरणाला विरोध झाल्यामुळेच या प्रेमी युगलाने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद जºहाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो.ना. सुनील भिवसने हे करीत आहे. दरम्यान, फर्दापूर परिसर हा दिवसेंदिवस सुसाईड पॉइंट होत चालला आहे. कधी अजिंठा घाटात तर कधी परिसरात अशा घटना घडत असतात.
पहूर पोलिसात होती हरविल्याची नोंद
दरम्यान, शिवण क्लासला जाते असे सांगून अश्वीनी ही शनिवारी घरातून बाहेर पडली होती. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंदही करण्यात आली होती.

Web Title: Love poisoning of lover, 'her' death, and 'her' fight with death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव