पाचोरा येथे उर्दू शाळेला पालकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 05:47 PM2017-11-14T17:47:37+5:302017-11-14T17:54:25+5:30

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा संताप

The locks cast by the parents to the Urdu school at Pachora | पाचोरा येथे उर्दू शाळेला पालकांनी ठोकले कुलूप

पाचोरा येथे उर्दू शाळेला पालकांनी ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्देएक शिक्षक सांभाळतात तीन वर्गशिक्षण विभागाकडे तक्रार करूनही समस्येचे निवारण नाहीपालकांनी ठोकले शाळेला कुलूप

आॅनलाईन लोकमत
पाचोरा,दि.१४ : शहरातील संभाजीनगर भागातील जिल्हा परिषद उर्दू मुला-मुलींच्या शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत संतप्त पालकांनी उपस्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता शाळेला कुलूप ठोकण्यात आले.
या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या शाळेत एकमेव शिक्षक तीन वर्ग सांभाळतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शिक्षण घेण्यापासून हाल होत आहेत. आजपर्यंत गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही, अशी पालकांची व्यथा आहे.
शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख जावेद शेख यांच्या नेतृत्वाखाली व पालकांनी उपस्थितीत या शाळेला कुलूप ठोकले. या वेळी अझहर खान आमद खान, शेख राजू, जारगावचे उपसरपंच युसूफ शाह, गफ्फार सैयद नूर, रहेमान खान हसन खान, शेख बबलू शेख हमीद, निसार सैयद गयास, चांद शहा, रमजान रशीद टकारी, इमरान खान बशीर खान आदी उपस्थित होते.

Web Title: The locks cast by the parents to the Urdu school at Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.