नदीच्या घाणीतून करतात ते उपजीविका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 03:00 PM2019-04-13T15:00:37+5:302019-04-13T15:05:30+5:30

श्रद्धेतून व भावनेतून तालुक्यातील कपिलेश्वर येथील तापी पांझरा संगमावर अर्पण केलेल्या विविध शृंगारिक वस्तू नदीच्या गाळातून खोदून एक कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहे.

Livelihood | नदीच्या घाणीतून करतात ते उपजीविका

नदीच्या घाणीतून करतात ते उपजीविका

Next
ठळक मुद्देभाविकांच्या भावनेवर होतो त्यांचा उदरनिर्वाहगाळ घाणीतून शोधले जाते सोने चांदीमात्र कधी कधी मेहनत वाया जाते





संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : श्रद्धेतून व भावनेतून तालुक्यातील कपिलेश्वर येथील तापी पांझरा संगमावर अर्पण केलेल्या विविध शृंगारिक वस्तू नदीच्या गाळातून खोदून एक कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहे.
तालुक्यातील कपिलेश्वर हे तापी पांझरासह एक अदृश्य नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेले होळकरकालीन महादेवाचे प्राचीन मंदिर असून, गेल्या काही दिवसांपासून या मंदिराचे धार्मिक महत्व वाढले आहे. अमळनेर, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यांच्या सीमेवर हे मंदिर आहे. पांझरा नदीवर पूल तर नदी पात्रात नावेची सोय असल्याने परिसरातील भाविक पूजेसाठी येत असतात. या मंदिरावर दररोज लघु रुद्र, कालसर्प, त्रिपिंडी यासह सोमवार उद्यापन, अभिषेक अशा पूजा केल्या जातात. विशेष म्हणजे सोमवार, अमावस्या, पौर्णिमा, पर्वणी अशा दिवशी गर्दी वाढलेली असते. ज्या महिलांना मूलबाळ होत नाही त्या महिलादेखील श्रद्धेपोटी तापी नदीला कपडे, भांडे, साडी चोळी, शृंगारिक दागिने त्यात चांदी सोने अर्पण करतात. या सर्व वस्तू नदीच्या पाण्यात मंदिराच्या टेकडीच्या पायथ्याशी वाहून येतात. मुडावद येथील एक मातंग समाजाचे कुटुंब जनतेच्या श्रद्धेवर, भावनेवर आपली उपजीविका करतात. दररोज सकाळपासून लहान मुलांसह दोघे तिघे गाळ खोदण्याचे काम करतात. दुर्गंधी, घाण, आरोग्य याचा विचार न करता पोटासाठी चिखलात पाय रूतवून त्यांचा शोध सुरू असतो. त्यात भांडी, कपडे यासह विविध शृंगारिक वस्तू आढळून येतात. गाळ चाळणीने गाळून, धुवून सोने चांदी मिळवले जाते. सुमारे एक ते दीड हजार रुपये रोजची कमाई होते. मात्र कधी कधी मेहनत वाया जाते आणि हातात काहीच लागत नाही.

विविध समस्या, संकटातून मुक्त होण्यासाठी तापी नदीला पवित्र गंगेसमान दर्जा भविकांच्या मनात असल्याने भावनेपोटी देवीला शृंंगार अर्पण करीत आहोत हे मनात ठेवून साडी, चोळी, दागिने अर्पण केले जातात. ते कोणाकडून सांगितले जात नाही. -रामदेव महाराज, पुजारी, कपिलेश्वर मंदिर, अमळनेर

Web Title: Livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.