जळगाव जिल्ह्यात देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:11 AM2018-02-08T00:11:05+5:302018-02-08T00:12:58+5:30

जळगाव शहर व जिल्ह्याला सिमी या देशविरोधी संघटनेचा इतिहास आहे. याशिवाय राज्यस्तरावर जिल्ह्याची ओळख संवेदनशील असल्याने देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवून त्याची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळवावी असे आवाहन दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक (एटीएस) सुनील कोल्हे यांनी केले.

Keep an eye on the tremendous movement in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवा

जळगाव जिल्ह्यात देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवा

Next
ठळक मुद्दे ‘एटीएस’च्या अधीक्षकांच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकाची समन्वय बैठक जळगाव जिल्ह्यात सिमीचा इतिहास

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,७ : जळगाव शहर व जिल्ह्याला सिमी या देशविरोधी संघटनेचा इतिहास आहे. याशिवाय राज्यस्तरावर जिल्ह्याची ओळख संवेदनशील असल्याने देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवून त्याची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळवावी असे आवाहन दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक (एटीएस) सुनील कोल्हे यांनी केले.
  दहशतवाद विरोधी पथकाची समन्वय बैठक घेण्यासाठी सुनील कोल्हे बुधवारी जळगाव दौºयावर आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक एटीएसचे पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव, सहायक निरीक्षक घुगे, उपनिरीक्षक नरेंद्र साबळे, जळगाव एटीएसचे गणेश इंगळे उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी कोल्हे यांनी दहशतवाद विरोध पथकाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग निष्पन्न झालेल्यांची सद्यस्थिती तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Web Title: Keep an eye on the tremendous movement in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.