जळगावात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:06 PM2018-04-12T13:06:23+5:302018-04-12T13:06:23+5:30

जि.प. समोर ठिय्या

'Kambandand' movement of employees in Jalgaon's health department | जळगावात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ आंदोलन

जळगावात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ आंदोलन

Next
ठळक मुद्देआरोग्य सेवेसह विविध कामांवर परिणामविविध सेवांवर परिणाम

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १२ - आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाºयांनी ११ एप्रिल पासून कामबंद आंदोलन पुकारले असून यामध्ये जवळपास ४०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कर्मचाºयांनी जि.प. समोर ठिय्या देत घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे आरोग्य सेवेसह विविध कामांवर परिणाम झाला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाºयांना नियमित सेवेत सामावून घेण्याची या कर्मचाºयांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाच्यावतीने ११ एप्रिलपासून कामबंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी सांगितले.
त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच एकही कर्मचारी कामावर गेला नाही. जिल्हाभरातील कर्मचाºयांनी काम बंद ठेवून जवळपास ४०० कर्मचारी सकाळी १० वाजेपासून जि.प. समोर ठिय्या मांडून बसले. या वेळी आंदोलकांनी मागण्यांसदर्भात घोषणा दिल्या.
अधिकारी, पदाधिकाºयांनी दिली भेट
आंदोलनस्थळी जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, शिक्षण सभापती पोपटराव भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदींनी भेटी दिल्या.
या वेळी आंदोलकांनी त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. समान काम, समान वेतन मिळावे, या मागणीसह विविध मागण्यांचे ठराव करण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्या वेळी उज्ज्वला पाटील यांनी हा विषय राज्यस्तरावरचा असून तुम्ही तसा ठराव द्या, त्यावर चर्चा करू व तो वरिष्ठ पातळीवर पाठवू असे सांगितले.
विविध सेवांवर परिणाम
कर्मचाºयांच्या या कामबंदमुळे आरोग्य सेवेसह शालेय आरोग्य तपासणी, सिकलसेल तपासणी, निधी उपलब्धता, अभियानांतर्गत सुरू असलेल्या बांधकामांवरही परिणाम झाला आहे.
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत कामबंद ठेवून दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जि.प. समोर ठिय्या देण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, सचिव अरुण पाटील, उपाध्यक्ष संजय भावसार यांनी सांगितले.

Web Title: 'Kambandand' movement of employees in Jalgaon's health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.