चाकूचा धाक दाखवून जळगावात धाडसी दरोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:25 PM2018-12-11T13:25:14+5:302018-12-11T13:30:10+5:30

चाकूचा धाक दाखवून रितेश जवाहरलाल कटारिया (वय ३४) या व्यापाºयाच्या घरातून तीन लाख रुपयांचे दागिने लुटून नेल्याची थराराक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता सिंधी कॉलनीतील गणेश नगरात घडली. कटारिया यांच्यासह अन्य तिघांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे.

Juggernaut brave robbery by knife | चाकूचा धाक दाखवून जळगावात धाडसी दरोडा 

चाकूचा धाक दाखवून जळगावात धाडसी दरोडा 

googlenewsNext
ठळक मुद्दे व्यापा-याचे तीन लाखाचे दागिने लांबविले सिंधी कॉलनीत पहाटे चार वाजता दरोडेखोरांचा धुमाकूळ अन्य तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

जळगाव :चाकूचा धाक दाखवून रितेश जवाहरलाल कटारिया (वय ३४) या व्यापाºयाच्या घरातून तीन लाख रुपयांचे दागिने लुटून नेल्याची थराराक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता सिंधी कॉलनीतील गणेश नगरात घडली. कटारिया यांच्यासह अन्य तिघांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे.
या थरारक घटनेची माहिती अशी की, रितेश कटारिया यांचे फुले मार्केटमध्ये रेडीमेट कापड दुकान आहे. सिंधी कॉलनी ते आकाशवाणी रस्त्यावरील गणेश नगरातील निलेश अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर कटारिया, पत्नी साक्षी व मुलगा पियुष (वय ५) वास्तव्याला आहेत. सोमवारी रात्री दुकानाचा हिशेब करुन १२ वाजता घर बंद करुन झोपले. पहाटे चार वाजता अचानकपणे दरवाजा तोडून चार जण घरात शिरले. जोराचा आवाज ऐकून घाबरलेले कटारिया दाम्पत्य झोपेतून उठून बेडरुमधून हॉलमध्ये आले असता तोंडाला मास्क बांधलेले चार जण कटारिया यांच्याजवळ आले. त्यातील एकाजवळ सुरा तर दुसºयाजवळ स्क्रु ड्रावर होता. अन्य दोघांच्या हातात बॅटरी होत्या.चौघांपैकी एका दरोडेखोराने कटारिया यांच्या मानेला सुरा लावत रितेश कटारिया यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची साखळी तोडली नंतर दोघांनी स्कु्र ड्रावरने कपाट उघडले व त्यातील दागिने,पाचशे रुपये रोख व एक मोबाईल असा तीन लाख रुपयांचा ऐवज काढून घेतला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Juggernaut brave robbery by knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.