In the Jalgaon Mayorun, at two o'clock in the night at 10 pm | जळगावातल्या मेहरुणमध्ये रात्री १० वाजता दोन गटांत तुंबळ हाणामारी
जळगावातल्या मेहरुणमध्ये रात्री १० वाजता दोन गटांत तुंबळ हाणामारी

जळगाव : मेहरुणमधील संतोषी माता नगरात (शेरा चौक) बुधवारी रात्री दहा वाजता पिरजादे व मुलतानी गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून लाठ्याकाठ्यांचा वापर झाला. त्यात नगरसेवक इकबालोद्दीन पिरजाने यांच्यासह सात जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हाणामारीमुळे या भागात सर्वत्र पळापळ होऊन तणाव निर्माण झाला होता. 

जाबीर खान साबीर खान (वय ३२, रा.अक्सा नगर,जळगाव) बिलालोद्दीन जामीरोद्दीन पिरजादे (वय ४५), मसीयोद्दीन जयाद्दीन पिरजादे (वय ५५), मो.शकील इकबाल पिरजादे (वय २७), मो.नासीर दारा पिरजादे (वय २५), इकबालोद्दीन जयोद्दीन पिरजादे (६१) व करीमोद्दीन पिरजादे (वय ३६) सर्व रा.मेहरुण हे जखमी झाले आहेत. मो.दारा पिरजादे गंभीर जखमी असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गणेशला मारहाणीमुळे झाला वाद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषी माता चौकात गणेश सपकाळे या तरुणाशी जाबीर नावाच्या तरुणाचा वाद झाला. शकील पिरजादे हा वाद सोडविण्यासाठी गेला असता त्याच्याशीही काही जणांनी वाद घातला. त्याने हा प्रकार वडील नगरसेवक इकबाल पिरजादे यांना सांगितला, त्यानंतर पिरजादे तेथे आले व जाबीर याच्या कानाच्याखाली मारली. त्यामुळे जाबीर यानेही पिरजादे यांना मारले. त्यामुळे दोन्ही गटातील तरुण समोरासमोर आले. काही मिनिटातच शंभराच्यावर जमाव जमला. हातात काठ्या घेऊन दिसेल त्याला बदडून काढले. यात अनेक जणांच्या डोक्याला, नाकाला व तोंडाला जबर मार लागला. रक्तबंबाळ अवस्थेत जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.


Web Title: In the Jalgaon Mayorun, at two o'clock in the night at 10 pm
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.