जळगाव येथे दोन लाख रोख व एक लाखाची दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:21 PM2018-03-04T12:21:57+5:302018-03-04T12:21:57+5:30

रामानंदनगर पोलिसांची कारवाई

Jalgaon caught two lakh cash and one lacquer liquor | जळगाव येथे दोन लाख रोख व एक लाखाची दारु पकडली

जळगाव येथे दोन लाख रोख व एक लाखाची दारु पकडली

Next
ठळक मुद्देसमता नगरात पोलिसांची धाड गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - समता नगरात सुरु असलेल्या जुगार व दारु अड्ड्यावर रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. त्यात सव्वा लाखाची रोकड व एक लाख रुपये किमतीची दारु हस्तगत केली. यात दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समता नगरात दिलीप सोनू सपकाळे यांच्या घरात पत्याचा जुगार अड्डा व दारु अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी उपनिरीक्षक रोहीदास ठांबरे व गुन्हे शोध पथकाला कारवाईबाबत सूचना केल्या होत्या. या पथकाने शुक्रवारी धाड टाकली असता जुगार खेळणारे पळून गेले. घटनास्थळावर मात्र दोन लाख रुपये रोख, जुगाराचे साहित्य तसेच एक लाख २ हजार रुपयांची देशी, विदेशी दारु आढळून आली. ही रोकड व साहित्य पोलिसांनी जप्त केले. जुगार मालक दिलीप सोनू सपकाळे व अंजनाबाई दिलीप सपकाळे यांना अटक करण्यात आली.

Web Title: Jalgaon caught two lakh cash and one lacquer liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.