जळगावात भरदिवसा चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:05 PM2017-07-29T13:05:50+5:302017-07-29T13:07:37+5:30

कारमधून आले चोरटे : कस्तुरी पार्कमधील भर दिवसाची घटना

jalagaavaata-bharadaivasaa-caoraicaa-parayatana | जळगावात भरदिवसा चोरीचा प्रयत्न

जळगावात भरदिवसा चोरीचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे चोरटय़ांनी फ्लॅटचा लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडून केला प्रवेश रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहेदोन खोल्यांमधील लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - शहरातील भिकमचंद जैन नगरातील कस्तुरी पार्कमध्ये  चोरटय़ांनी फ्लॅटचा लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडून प्रवेश करत चोरी केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आह़े मात्र घरात काही नसल्याने चोरटय़ांना रिकाम्या हाती परतावे लागल़े दरम्यान चोरी करुन परतणा:या चार चोरटय़ांना शेजारील महिलेने बघितले असून ते कारने आल्याची माहिती मिळाली. भरदिवसा चोरी करुन चोरटय़ांनी पोलिसांना आव्हान दिले आह़े
सेवानिवृत्त कर्मचारी रोहितकुमार मेहता यांच्या मालकीचा कस्तुरीपार्कमध्ये 102 क्रमांकाचा फ्लॅट आह़े मेहता हे कुटुंबीयांसह नागपूर येथे वास्तव्यास आहेत़ त्यामुळे फ्लॅट बंद असतो़  मेहता जळगावला ये-जा करुन पाहणी करत असतात़  6 रोजी नुकतेच मेहता जळगावला येऊन गेल़े शुक्रवारी या कुलूपबंद फ्लॅटमध्ये चार चोरटय़ांनी लोखंडी दरवाजाचा कोयंडा कापून प्रवेश केला़ चोरटय़ांनी दोन खोल्यांमधील लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकल़े यानंतर दुस:या रुममध्ये सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे आढळून आल़े 
अत्यंत वर्दळीच्या भागात चोरटय़ांनी या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रय} केला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  

Web Title: jalagaavaata-bharadaivasaa-caoraicaa-parayatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.