पैसे न भरता रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करणे आता शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 03:06 PM2019-04-28T15:06:54+5:302019-04-28T15:07:55+5:30

आयआरसीटीसीची अद्ययावत नवीन  ई-पे लेटर योजना प्रवाशांसाठी सुरू

It is now possible to book a train trip without paying money! | पैसे न भरता रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करणे आता शक्य!

पैसे न भरता रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करणे आता शक्य!

Next


भुसावळ : जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे. या योजनेत मात्र तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनी प्रवाशाला पैसे भरावे लागणार आहेत.
असे करा तिकीट बुक
आयआरसीटीसीमध्ये नवीन अकाउंट तयार करा किंवा आधीचे अकाउंट असेल तर लॉग इन करा. जे तिकीट बुक करायचे आहे त्याविषयी डिटेल्स भरा. तुमच्या सोयीनुसार ट्रेन निवडा आणि नंतर बुक नाऊवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला प्रवासाचा तपशील आणि कॅपचा कोड भरावं लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढच्या बटनावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. त्यात तुम्ही डेबिट, क्रेडिट, भीम अ‍ॅपचे डिटेल्स भरा. त्यानंतर ई-पे लेटरचे आॅप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ई-पे लेटरवर रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.ई-पे लेटर.इन जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बिल पेमेंटच आॅप्शन येईल. तो सिलेक्ट केल्यावर प्रवासाचे तिकीट मिळेल.
ई-पेमेंट योजना
या योजनेसाठी अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट मदत करेल. योजनेत आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर पैसे न भरता आॅनलाइन तिकीट बुक करता येईल. त्याचं पेमेंट १४ दिवसांनंतर करावे लागेल. या सेवेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांना पेमेंट करताना ३.५ टक्के चार्ज द्यावा लागेल. १४ दिवसांच्या आत पेमेंट करत असाल, तर जास्त व्याज द्यावं लागणार नाही. तुम्ही वेळेवर पैसे भरलेत तर तुमची क्रेडिट लिमिटही वाढेल.
तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनंतरही तुम्ही पेमेंट केलं नाहीत, तर तिकिटाच्या किमतीवर व्याज घेतलं जाईल. त्याहून जास्त उशीर केलात तर तुमचं अकाउंट रद्द होऊ शकतं.
ई-पे सेवा या सेवेचा फायदा तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटवरून घेऊ शकता. तुम्ही घेतलेल्या तिकिटाची किंमत तुमच्या क्रेडिटमध्ये असायला हवी आणि ठरलेल्या वेळेत पेमेंट व्हायला हवं. तुम्ही पेमेंट करायला उशीर केलात तर तुमचं के्रडिट कमी होईल. यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही, अशीही ही योजना आहे.मात्र या योजनेत सहभागी होताना तुमच्याजवळ पैसे नसले तरी पुढील प्रवासासाठी तुम्ही आरक्षित तिकीट बुक करू शकणार आहात.

Web Title: It is now possible to book a train trip without paying money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.