जीएसटीमुळे वाढल्या रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:51 PM2017-08-11T23:51:40+5:302017-08-11T23:55:28+5:30

ऑनलाईन प्रक्रियेमुळे लेखापालांना मागणी : प्रत्यक्ष काम करणा:यांची मात्र चणचण

Increased employment opportunities by GST | जीएसटीमुळे वाढल्या रोजगाराच्या संधी

जीएसटीमुळे वाढल्या रोजगाराच्या संधी

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाईन प्रक्रियेमुळे लेखापाल आवश्यकव्यापा:यांकडे संधीपूर्णवेळ लेखापालांना मागणी वाढली

ऑनलाईन लोकमत


जळगाव, दि. 11 -  वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीत प्रत्येक व्यापा:याला आपल्या व्यवहाराची नोंद ठेऊन त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. यामुळे लेखापालांची (अकाऊंटंट) मागणी मोठय़ा प्रमाणात वाढून रोजगाराच्याही संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेले अनेक जण असले तरी प्रत्यक्ष काम करणा:यांची चणचणही भासत असल्याचे चित्र आहे. 
जीएसटीमुळे अनेक वस्तूंचे भाव कमी जास्त झाले असले तरी त्याचा एक मोठा सकारात्मक परिणाम म्हणजे यातून रोजगाराच्या संधीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. 
ऑनलाईन प्रक्रियेमुळे लेखापाल आवश्यक
पूर्वी व्यापा:यांकडे व्यवहाराच्या नोंदी ‘मॅन्यूअली’ केल्या जात होत्या. मात्र आता जीएसटीची नोंदणी झाल्याने सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. पूर्वी नोंदी नाही केल्या तरी धकून जात होते. मात्र आता सर्व डेटा तयार करून रिटर्नही ऑनलाईन भरावे लागत आहे. त्यामुळे व्यापा:यांकडे लेखापालांना मोठी मागणी आहे. 
15 हजार व्यापा:यांकडे संधी
जळगाव शहरात एकूण 25 हजार व्यापारी आहेत. यामध्ये जीएसटी नोंदणी केलेले जवळपास 12 ते 15 हजार व्यापारी आहेत. या सर्वाकडे आता लेखापाल आवश्यक झाले आहेत. त्यात व्यापाराचे स्वरुप पाहून कोठे एक तर कोठे त्यापेक्षा जास्त लेखापालांना मागणी आहे. एका  व्यापा:याकडे सरासरी दोन लेखापाल जरी आवश्यक असल्यास 30 हजार लेखापालांना रोजगाराच्या संधी आहेत.
पूर्णवेळ लेखापालांना मागणी वाढली
पूर्वी व्यापा:यांकडे हिशेबाच्या नोंदणी ठेवण्यासाठी लेखापालांना काम दिले जात असे. त्यात ते वेगवेगळ्य़ा व्यापा:यांकडे जाऊन हे काम करून देत असे. मात्र आता जीएसटीमध्ये एका व्यापा:याला महिन्यात तीन रिटर्न भरावे लागत असल्याने पूर्णवेळ (फूल टाईम) लेखापानांना मागणी वाढली आहे.  
नोंदणी नसल्यास व्यापार ठप्प
जीएसटीच्या या प्रक्रियेत नोंदणी केल्यानंतर सर्व नोंदी वेळीच दाखल कराव्या लागणार आहे. हे टाळण्यासाठी नोंदणी केलीच नाही तर जीएसटी  क्रमांकाशिवाय विक्रेते संबंधिकांकडून माल खरेदी करणारच नाही व व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही नोंदणी करणे व लेखापाल कडून सर्व प्रक्रिया करून घेणे गरजेचे झाले आहे.
लेखापालांची चणचण
व्यापा:यांकडे हे काम वाढले असले तरी लेखापालांची चणचण भासत आहे. त्यात वाणिज्य शाखेचे शिक्षण झाले असले तरी प्रत्यक्ष लेखापालचे काम करणे अनेकांना जमत नसल्याने लेखापालच्या शिक्षणासह ही सिस्टीम चालविता येणेही गरजेचे आहे.असेलेखापालखूपकमीअसल्याचेसांगितलेजातआहे.
सी.ए.कडेही येणा:यांच्याही अडचणी
अनेक लेखापाल सी.ए.कडे लेखापालचे काम शिकायला येतात. मात्र प्रत्यक्ष त्यांना काम दिले तर ते करू शकत नाही. कारण शिक्षण घेताना प्रत्यक्ष काम कसे चालते, याचे प्रात्यक्षिक न केल्याने या अडचणी येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परिणामी जीएसटीमुळे आता अभ्यासक्रमातही प्रत्यक्ष कामाच्या  स्वरुपातील शिक्षण द्यावे लागणार आहे.
लहान गावांमध्ये मोठय़ा अडचणी
शहरात प्रशिक्षित लेखापाल तर मिळून जातात मात्र गावांमध्ये अधिक अडचणी येत असल्याचे चित्र आहे. तेथे लेखापाल उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिकांना अडचणी येत आहे. 
व्यापा:यांना झळ
या सर्व नोंदी ठेवण्यासाठी लेखापाल आवश्यक झाल्याने त्यांच्या मोबदल्याची झळ थेट व्यापा:यांना बसणार आहे. 

जीएसटीमुळे सर्व नोंदी ऑनलाईन कराव्या लागत असल्याने लेखापालांना (अकाऊंटंट) मागणी वाढली आहे. व्यापा:यांकडून याची जास्त मागणी आहे. मात्र प्रत्यक्ष हे काम करणा:यांची संख्या खूप कमी असल्याने त्यांची चणचण आहे. 
- सी.ए. अनिल शाह.

जीएसटीच्या कामासाठी व्यापा:यांना लेखापाल आवश्यक झाले आहेत. त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे. व्यापारी आता पूर्णवेळ लेखापाल ठेवण्याच्या तयारीत आहेत. 
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन. 

Web Title: Increased employment opportunities by GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.