भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ अवैध वाळू साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:44 PM2018-12-19T23:44:54+5:302018-12-19T23:46:26+5:30

भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू साठा जप्त केली.

Illegal sand stocks were seized near Sakkegaon in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ अवैध वाळू साठा जप्त

भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ अवैध वाळू साठा जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देदीड लाखाची वाळू जप्तमहसूल प्रशासनाने केली कारवाईजप्त केलेली वाळू शासकीय बांधकामासाठी वापरणार

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू साठा जप्त केली.
वाघूर नदीच्या पात्राजवळ साकेगाव तिघ्रे शिवारात वाळूमाफियांनी अवैध वाळूचा साठा केलेला होता. जळगाव येथील महसूल विभागाचे तहसीलदार अमोल निकम तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, अज्ञात वाळूमाफियांनी सुमारे एक ते दीड लाख किमतीचा सुमारे ३० ते ५० ब्रास वाळूचा साठा केलेला होता. येथे महसूल विभागाने धाड टाकली. तेव्हा हा साठा जप्त करण्यात आला. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. जप्त करण्यात आलेला वाळू साठा शासकीय कामात वापरण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, यामुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोणकोणत्या ठिकाणी वाळूचे साठे आहे व कमी परमिट घेऊन जादा गौणखनिज उचल करणाºयांवर कारवाई येणार आहे.

Web Title: Illegal sand stocks were seized near Sakkegaon in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.