‘हास्यधारे’च्या हास्यकल्लोळात ओले चिंब झाले रसिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:10 AM2019-07-22T01:10:51+5:302019-07-22T01:11:26+5:30

जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सांस्कृतिक या सदरात लिहिताहेत अशफाक पिंजारी...

The humorous humorous humorous humorous melodious rhyme | ‘हास्यधारे’च्या हास्यकल्लोळात ओले चिंब झाले रसिक

‘हास्यधारे’च्या हास्यकल्लोळात ओले चिंब झाले रसिक

googlenewsNext

वात्रटिका म्हणजे काय हो? तर वात्रटिका म्हणजे अशी हास्यकविता ज्यात अतिशयोक्ती असते, विडंबन असते, मिश्किलपणा, थट्टेखोरपणा असतो, मर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती असते आणि दांभिकतेवर प्रहार केलेला असतो. या वात्रटिकेत शब्दांना जितके महत्व असते तितकेच महत्व त्याच्या सादरीकरणाला असते. आज वात्रटिका म्हटले की जे नाव प्रामुख्याने डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे रामदास फुटाणे.
जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास फुटाणे यांनी ‘हवा येते हवा जाते..., बदलतात रंग..., काँग्रेस होती नोकिया आणि भाजप सॅमसंग.. या विडंबन काव्यासह विनोदी कवितांनी रसिक अक्षरश: लोटपोट झाले आणि या ज्येष्ठ कवीच्या कवितांनी जगण्याचा संदेशही दिला.
‘कधी कधी माझा देश आहे...’ फेम या वात्रटिकाकाराने विनोदी फटकेबाजी करीत हास्याचा फुलोरा फुलविला. या बहारदार कार्यक्रमाद्वारे रसिकांना एकाहून एक सरस हास्यकविता ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. जणू काही पावसाळी वातावरणात एकप्रकारे नामवंत कवींच्या हास्य धाराच या वेळी बरसत होत्या.
शतकोत्तर व.वा.वाचनालयाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवाणी घेऊन येत असतो. त्यानुसार यंदाचा वर्धापन दिन पावसाळी वातावरणात पाऊस धारांसह ‘हास्य धारा’ घेऊन आला होता. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या विडंबन काव्याने जळगावकर रसिकांना रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचालन करून आपल्या खुमासदार आणि मिश्किल शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमात सादर होणाऱ्या प्रत्येक काव्यपंक्तींना हंशा आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता. हास्य-विनोद अनुभवण्याची संधी ‘हास्य धारा’च्या माध्यमातून व.वा.वाचनालयाने जळगावकर रसिकांना उपलब्ध करून दिली होती. ही खरे म्हणजे आम्हा रसिकांसाठी पर्वणीच होती.
यासोबतच दीर्घकाव्य संग्रहकार तसेच नाट्यलेखक, कवी अनिल दीक्षित (पुणे) यांनी नोटाबंदीवर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर कविता सादर केली.ललित लेखक, कवी साहेबराव ठाणे (अहमदनगर) यांनी शेती, माती आणि ग्रामीण जीवनावरील कविता सादर करून खेड्यातले वास्तव मांडले. ज्यांच्या कविता दूरचित्रवाणीवरून राज्यभरात पोहचलेल्या असे कवी भरत दौडकर (शिक्रापूर) यांनी जमिनीच्या गुंठेवारीवरील कविता सादर केली. चित्रपट गीतकार, गझलकार, ‘जळणाराल्या विस्तव कळतो... बघणाºयाला नाही, जगणाºयाला जीवन कळते... पळणाºयाला नाही’ ही मार्मिक कविता कवी नितीन देशमुख (चांदूरबाजार) आणि कवी नारायण पुरी (तुळजापूर) या नामवंत कवींनी ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ ही विनोदी कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. अशा नामवंत कवींच्या कविता ऐकण्याचा हा आनंददायी सोहळा जळगावकर रसिकांना अनुभवता आला. नव्हे तर तो सोहळा रसिकांच्या कायम स्मृतीत राहणार आहे.
-अशफाक पिंजारी, जळगाव

Web Title: The humorous humorous humorous humorous melodious rhyme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.