दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा उच्चांक प्रस्थापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 07:04 PM2018-12-09T19:04:23+5:302018-12-09T19:05:53+5:30

दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र्र हे रोज नवनवीन उच्चांक ...

Highlighting of Deepangar thermal power plant | दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा उच्चांक प्रस्थापित

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा उच्चांक प्रस्थापित

googlenewsNext
ठळक मुद्देकोळशाच्या १६५ वॅगन केल्या आठ तासात रिकाम्याकोणताही विलंब शुल्क न लागता, अनलोड करून कोळसा केला खाली

दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र्र हे रोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे. ३ डिसेंबर रोजी कोळसा हाताळणी विभागाने विक्रमी कोळसाच्या १६५ वॅगन आठ तासांत रिकाम्या करून ११,२२० टन कोळसा विलंब शुक्ल न लागता, अनलोड करून विक्रम प्रस्थापित केला.
महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक चंद्र्रकांत थोटवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाच कलमी कार्यक्रमांंतर्गत कोळसा हाताळणी विभागाने ८ रोजी अजून एक नवीन विक्रम प्रस्थपित करून सतत कोळशाचा ३०० वॅगन विलंब शुक्ल न लागता रिकाम्या केल्या. हा महानिर्मितीमधील एक अनोखा विक्रम कोळसा हाताळणी विभागाने केला. तसेच ५०० मेगावॅटचा संच क्रमांक पाच हा सतत ३६५ दिवस बाष्पक ट्यूब लिकेज न होता अविरत सुरू आहे. यासाठी कोळसा हाताळणी विभागातील तसेच बॉयलर व संचलन विभागातील सर्व अभियंते/कर्मचारी, कंत्राटदार, कर्मचारी यांचे योगदान आहे म्हणून मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर, नंदकिशोर देशमुख, अधीक्षक अभियंता मधुकर पेटकर, मदन अहिरकर यांनी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. यासाठी हेमंत लहाने व परिमल रामटेके यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी राजेंद्र निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Highlighting of Deepangar thermal power plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.