भला माणूस माणुसकी जपतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 03:53 PM2019-06-11T15:53:28+5:302019-06-11T15:53:49+5:30

गेल्या चार-पाच वर्षांपासून तो गावात आलाय. कधी बसस्थानकावर तर कधी कॉलेजच्या बसस्टॉपवर फिरताना दिसतो. दाढी वाढलेला, उंचपुरा, कळकट-मळकट कपडे घातलेला, पांढरी दाढी वाढलेला. इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्राचा कागद हाती घेतलेला भला माणूस नजरेला पडतो. कधी मंदिरासमोरच झोपून गेलेला. असा हा अवलिया माणूस प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो.

Good man | भला माणूस माणुसकी जपतोय

भला माणूस माणुसकी जपतोय

Next

रस्त्यानं जाणारी माणसं कधी पैसे देतात, तर कधी बिस्किटचा पुडा हाती ठेवतात. आज मात्र तो माणूस बसस्टॉपमध्ये झोपूनच होता. सतत दिवसभर फिरणारा दोन दिवसांपासून तिथेच पडून होता. तसं हे गाव हायवेला लागून असल्यानं अनेक मनोरूग्ण गावात येतात अन् निघून जातात. पण हा माणूस गेल्या चार-पाच वर्षांपासून वास्तव्याला आहे. कुणाला त्रास नाही.
‘काय जेवण केलं का?’ तरूण.
‘ताप हाये राजा माले.’
तरूण मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन आला. पाण्याची बाटली दिली. त्यानं गोळी घेतली तेवढ्यात दुसरा वेडसर माणूस त्याच्याजवळ आला. त्यानं प्लॅस्टिकच्या थैलीत आणलेली भाजी-भाकरी त्याला दिली. दोघं जण अगदी शहाण्या माणसांना लाजवतील, अशी जेवण करीत होती. थंडीचे दिवस असल्यानं म्हातारा कधी मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा बसथांब्याच्या निवाºयामध्ये थांबायचा. आज जास्तच थंडी असल्यानं तो थंडीत कुडकूडत होता. अधून-मधून डोकं भिंतीला टेकवून बसायचा. शेजारच्या पिशवीत हिरवी वांगी, मिरची, बटाटे भरून पडलेली. अंगावर ओढायला काहीही नाही. रात्री येणारी-जाणारी माणसं खोटा कळवळा बोलून पुढे जायची.
‘काय बाबा, थंडी वाजते का?’ तरूण.
वाजते नं. मंग काय कºयाचं? आज म्हातारा चांगलाच मुडमध्ये होता. ‘काय बाबा, तुमचं नाव काय?’
‘विठ्ठल...’
‘म्हणू थंडीनही वाजूं राहिली रे भो...’
म्हातारा एवढ्या रात्री पेपरमधील बातमी वाचत होता. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात तो वाचत बसायचा. तेव्हा रस्त्यानं जाणारे-येणारे लोक अवाक व्हायचे. तरुणानं रस्त्याच्या कडेला अंधारात जाऊन तो तुरखाट्या आणायला गेला. तेव्हा विठ्ठल म्हणाला, ‘ईचु काटा पाह्यजो भो. अंधारामधी काऊन हात घालून राह्यला भो. आम्हाले काय थंडी वाजतनी.’
तरुण मुलाला विठ्ठलबद्दल जास्तच आपुलकी, प्रेम निर्माण झाले. तो घरी गेला, अन् घरून शाल घेऊन आला.
‘‘घ्या विठ्ठल बोवा..’ त्यानं शाल घेऊन पोतडीवर ठेवली अन् शेकोटीवर जाऊन बसला. रात्र झाली तरूण घरी निघून गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार ‘कोण म्हणतं माणुसकी नाही. ज्या माणसाला समाजानं वेडा ठरवलं; तो तर शहाण्या माणसाला लाजवेल अशा गोष्टी करीत होता. त्याला ‘विठ्ठल’चे ‘ईचु काटा पाह्यजो’ हे शब्द कानामध्ये घुमत होते. गावात अनेक वेडसर लोक होते. पण हा वेगळाच माणूस आहे ही खात्री तरूणाची नव्हे तर संपूर्ण गावाची झाली होती. त्यातच त्याच्याबरोबर ‘कोंबडी चोर’ असा इसम गावात फिरायचा. पण त्याला कुणीही सहानुभूती किंवा प्रेम दाखवत नव्हतं. तो सतत हायवेवर चालत राहायचा. कधी या गावात तर उद्या दुसºया गावात. त्यामुळे तो एका गावात राहत नव्हता. त्यातच लोकांनी त्याला ‘कोंबडीचोर’ म्हणून घोषित केलं होतं.
आज भलतीच थंडी पडली होती. रस्त्यानं जाणाºया-येणाºया लोकांची संख्या कमी झाली होती. परवा-तरवा तरुण मित्रानं दिलेली शाल विठ्ठलजवळ नव्हती. तरुणानं न राहवून त्याला विचारलं,
‘विठ्ठल बोवा शाल कुठीयाय?’ विठ्ठलाने बसथांब्याच्या मधल्या भागाकडे बोट दाखवलं. तर काय? जो दुसरा वेडसर माणूस ज्याला कोंबडी चोर म्हणायचे, तो पांघरून झोपला होता अन् स्वत: विठ्ठल मात्र थंडीत अंगावरच्या कपड्यांवर झोपला होता. तेव्हा तरूण म्हणाला, ‘विठ्ठल बोवा खरंच तू भला माणूसाय, खरंच तुझ्या निरागस प्रेमाला माझा सलाम, तुझ्या माणुसकीला. आज समाजातील माणुसकी हरवत असताना विठ्ठला ऽ तू मात्र ‘माणुसकी जोपासतोय’, खरंच तू भला माणूसाय’ कोण? कोठला? विठ्ठल पण नंतर समजलं. तो हिंगणघाटचा आहे. पण डोक्यावर परिणाम झाल्याने तो गावात आलाय. कधी कोणाला मागणार नाही. पण माणसं त्याला न मागता पैैसे देतात. हॉटेलवाले कचोरी, भजे, समोसे देतात. पण विठ्ठल ते तिथे कधी खात नाही. बसथांब्यावर येऊन आपल्याबरोबर असणारे दोन जण यांच्याबरोबर खातो. जवळ असलेली ५०-६० रुपयांची चिल्लर मुक्ताई पालखीबरोबर आलेल्या भगिनीला देतो. तेव्हा तर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी स्टॉपवर कालीपिली चालवणाºया ड्रायवर लोकांनाही चहा पाजतो. रस्त्यानं रडत असलेल्या मुलाला खिशातील बिस्टीटपुडा देतो. असा हा ‘भला माणूस’ खरंच माणुसकी अन् माणसांसाठी आपुलीचा विषय आहे.
- अ.फ. भालेराव, मुक्ताईनगर

Web Title: Good man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.