गझल ही वृत्ती जोपासली जावो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:23 PM2017-12-09T16:23:59+5:302017-12-09T16:24:32+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये कवयित्री योगिता पाटील यांच्या कवितेविषयी, गझलविषयी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अस्मिता गुरव यांनी घेतलेला आढावा.

Gazal's attitude should be appreciated .. | गझल ही वृत्ती जोपासली जावो..

गझल ही वृत्ती जोपासली जावो..

googlenewsNext

कविता हा प्रकार जितका दिसतो आणि वाटतो तितका सहज सोपा नाही. कविता लिहिण्याची हौस असली तरी लिहिणा:या प्रत्येकाला ती जमेलच असे नाही. चूकपणे सापडेलच असे नाही, कविता ही तारेवरच्या कसरतीसारखी आहे. ज्याला साधली त्यालाच त्यातलं कठीण काय आहे ते कळतं. एरवी सोपी वाटते म्हणून लिहायला गेलं तर कविता फसते-फसवते. गझल हाही त्यातलाच प्रकार. गझल तांत्रिक आहे, ती कार्यशाळेत शिकून लिहिता येते, असं म्हणणा:यांना अक्षर-गण-मात्रा आणि वृत्त याबद्दलचे तंत्र सांगता येईल पण तेवढं येणं म्हणजे गझल नाही कारण कविता असो की गझल त्यात ‘भाव’ नसेल तर ती भावत नाही. कविता आणि गझल ही वृत्ती आहे. ज्याची विचार, भावना तरल आहे त्याला निरीक्षणाची जोड आहे जगण्याकडे आणि दु:खाकडे जिंदादिलीने पाहण्याची वृत्ती आहे त्याच्याच कवितेत, गझलेत अर्थपूर्णता दिसून येते. योगिता पाटील हे खान्देशातील एक नव्याने लिहिणा:यांमधील चांगले नाव. योगिताची कविता आणि गझल अर्थपूर्ण, सामाजिक जाण आणि भान असलेली आहे कारण जगण्याकडे संवेदनशीलतेने बघण्याची वृत्ती ही त्यांच्या लेखनात दिसते म्हणून त्यांची गझल ही मनाला भिडते आणि रसिकांची दाद घेऊन जाते. योगिताचा शिक्षकी पेशा. वाचनाची आवड. सुरेश भटांची गझल वाचता वाचता गझल वाचणं आणि आपले विचार, भावना त्या फॉर्ममध्ये लिहून पाहू म्हणून त्यांनी जे लिहिलं त्याचं कौतुक होत गेलं. जाणकारांनी त्यातील त्रुटी समजावून सांगितल्या, त्यातून सुरू झाला गझल प्रकाराचा अभ्यास. ध्यास असला की परिश्रम घ्यायची तयारी असते आणि त्यातून कवी विकसित होत जातो. निरीक्षण आणि अनुभवाकडे सजगतेनं बघण्याच्या सवयींनी कविता सकस होत असते, हे योगिताने व्यवस्थित समजून घेतलं आणि त्यातूनच नामवंतांच्या, समकालीन कवींच्या कविता वाचण्याचा समजून घेण्याचा प्रवास सुरू झाला. या वाटेवर त्यांना खूप काही मिळत गेलं. आपण कविता लिहितो, ती अर्थपूर्ण हवी हा त्यांचा स्वत:शीच संघर्ष होता. कवितेत तडजोड नसते हे सत्य त्यांना केवळ कळलं असं नाही तर त्यातूनच नवे विषय हाताळण्याचा प्रयत्न करावासा वाटायला लागला. वाचनात कविता वाचायची आवड आहे त्यातही गझलची अधिक गोडी. उत्तम गझल कशी जमते, त्यातील बारकावे, त्यातील लय आणि अचूक शद्बरचना यासाठी त्यांनी अनेक गझलकारांच्या रचनांचा अभ्यास तर केलाच पण त्यासंदर्भात जाणकारांशी चर्चा आणि मार्गदर्शनही संपादन करत असल्याने त्यांना गझलची लय सापडली. पुण्यात संपन्न होणा:या ‘गझलरंग’ या कार्यक्रमात त्यांना सहभागासाठी निमंत्रित करण्यात आले. जाहीररीत्या रसिकांसमोर गझल सादरीकरणाचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. पण त्यात त्यांच्या गझलेचं खूप कौतुक झालं आणि त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने त्यांना चांगली गझल, चांगली कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. गेले तीन-चार वर्षे झाले योगिता पाटील यांच्या कविता, गझल या दज्रेदार दिवाळी अंकातून प्रकाशित होत आहेत. आपण करत असलेलं काम हे जबाबदारीने पार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे परिश्रम घेण्याची त्यांची सवय त्यांना नेहमीच यश देत असते. ‘लोकमत’ दिवाळी अंकातील गझल स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी असो की, कवयित्री बहिणाबाईंच्या वाडय़ातल्या कविसंमेलनात कवितेचं सादरीकरण असो प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं. ‘लोकमत’तर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘काव्यऋतू’ या स्पर्धेत यंदाच्या वर्षी योगिता पाटील यांची गझल पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. खान्देशच्या मातीतल्या नवे विचार-नवा आशय घेऊन लेखणी हाती घेतलेल्या योगिता यांच्या हातून दज्रेदार सकस कविता-गझल लिहिल्या जावोत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळोया शुभेच्छा.!!

Web Title: Gazal's attitude should be appreciated ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.