मळगाव येथे भाजीपाला मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:29 PM2020-03-30T20:29:35+5:302020-03-30T20:30:36+5:30

कोरोनाच्या स्थितीमुळे तालुक्यातील मळगाव येथील शिवाजी परभत पाटील या शेतकऱ्याने गावाला मोफत भाजीपाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Free distribution of vegetable to Mulgaon | मळगाव येथे भाजीपाला मोफत वाटप

मळगाव येथे भाजीपाला मोफत वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णयग्रामस्थांनी केले कौतुक

भडगाव, जि.जळगाव : कोरोनाच्या स्थितीमुळे तालुक्यातील मळगाव येथील शिवाजी परभत पाटील या शेतकऱ्याने गावाला मोफत भाजीपाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंंमलबजावणी ३० मार्चपासून केली.
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. नागरिकांसह महिला घरात बसून आहेत. बाजारात माल नेण्यास वाव नाही. एकीकडे भाजीपाला जादा बेभाव विक्री होताना नागरिकांची लूट होत आहे. मात्र दुसरीकडे मळगाव येथील शिवाजी परभत मिस्तरी या शेतकयाºयाने गावातील नागरिकांना भाजीपाला मोफत पुरविण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे.
या शेतकºयाने एक हेक्टर जमिनीपैकी एक एकरच्या आसपास मिरची, वांगे, भेंडी इ.फळभाज्यांची लागवड केली आहे. त्यांची घरची परीस्थिती साधारण असल्याने शेती व मिस्तरी काम करून प्रपंच चालवितात. मात्र कोरोना आपत्तीच्या बंदमध्ये गावातील गोरगरीब जनतेला ताजा भाजीपाला मिळावा व शासनाने केलेला बंद यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्यांचा सुपुत्र सुरेश शिवाजी मिस्तरी यांनी सरपंच,ग्रामसेवक, सदस्य, पोलीस पाटील यांच्याशी चर्चा करून २ दिवसांपूर्वीच फळभाजी मोफत वाटपाचा निर्णय घेतला.
या दातृत्वाबद्दल मळगाव येथील सरपंच सुशीला पाटील, ग्रामसेवक एस.बी.जाधव, पोलीस पाटील, सर्व ग्रा.पं.सदस्य, ग्रा.पं.कर्मचारी व ग्रामस्थ यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Free distribution of vegetable to Mulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.