चौपदरीकरणामुळे महामार्गाचे समांतर रस्ते अशक्यच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:17 PM2019-01-31T12:17:13+5:302019-01-31T12:18:25+5:30

वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

Four-way parallel roads of parallel roads! | चौपदरीकरणामुळे महामार्गाचे समांतर रस्ते अशक्यच !

चौपदरीकरणामुळे महामार्गाचे समांतर रस्ते अशक्यच !

Next
ठळक मुद्देदुसºया टप्प्याचे केवळ गाजरच


जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्यात येणार असून,यासाठी ६२ कोटी रुपयांची निविदा देखील काढण्यात आली आहे. मात्र, शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्यामुळे आता समांतर रस्त्यांची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर समांतर रस्ते अशक्यच असल्याची धक्कादायक माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’ शी खासगीत बोलताना दिली.
त्यामुळे सध्या प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून समांतर रस्त्यांबाबत देण्यात येणारे आश्वासन केवळ पोकळ असल्याचीही माहिंती अधिकाºयांनी दिली आहे. समांतर रस्त्याच्या मागणीसाठी संमातर रस्ते कृती समिती व नागरिकांकडून दबाव असल्याने शहरातील महामार्गाच्या चौपदीकरणानंतर समांतर रस्त्यांचे काम केले जाणार असल्याचे खोटे आश्वासन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत असल्याचीही माहिती या अधिकाºयांनी दिली आहे.
पाईपलाईन स्थलांतराच्या सूचना नाही
समांतर रस्त्यांचे काम करण्याचा विचार प्रशासनाचा राहिला असता तर मनपाला समांतर रस्त्यांच्या कामासाठी अडचणीची ठरणारी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत करावी लागणार होती. २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या बैठकीत मनपाला हे काम १५ दिवसांच्या आतच करावे लागणार होते. मात्र, या बैठकीला दोन महिने होवून देखील हे काम झालेले नाही. याबाबत मनपाचे शहर अभियंता डी.एस.खडके यांना विचारले असता, याबाबत ‘नही’ कडून कोणतेही पत्र मनपाला मिळालेले नाही, चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईनचा अडथळा ठरत नसल्याचीही माहिती त्यांनी दिली.
समांतर रस्ते न होण्यामागचे कारण
1 ६२ कोटी रुपयांमधून राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम शहरात होणार आहे. त्यामुळे महामार्गावरून होणारी बरीचशी वाहतूक नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे समांतर रस्ते तयार करण्याची आवश्यकता नसल्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
2 वर्षभरातच शहराबाहेरून बायपासचे काम होणार आहे. त्यामुळे शहरातून जाणाºया महामार्गावरून जाणाºया वाहतुकीची वर्दळ ६० टक्कयांनी कमी होणार आहे. त्यातच शहरातील महामार्गाचे चौपदीकरण झाल्यास महामार्गावर सध्याचा घडीला निर्माण होणरी वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच समांतर रस्त्यांचे काम केले जाणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
चौपदरीकरणासाठी निविदेला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
चौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात होणाºया कामासाठी ६२ कोटी रुपयांची निविदेला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता १० फेब्रुवारीपर्यंत या निविदेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिंती ‘नही’च्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या निविदेची किंमत ७० कोटींवरून ६२ कोटी झाली आहे. या बदलामुळे निविदा दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत.

Web Title: Four-way parallel roads of parallel roads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.