जळगावात दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण निर्मूलन मोहीम, दुपारपर्यंत १५० अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:10 PM2018-12-14T13:10:57+5:302018-12-14T13:11:21+5:30

टॉवर चौकात किरकोळ वाद

Encroachment eradication campaign in Jalgaon | जळगावात दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण निर्मूलन मोहीम, दुपारपर्यंत १५० अतिक्रमणांवर हातोडा

जळगावात दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण निर्मूलन मोहीम, दुपारपर्यंत १५० अतिक्रमणांवर हातोडा

googlenewsNext

जळगाव : जळगाव शहरात गुरुवारपासून सुरू झालेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम शुक्रवारी दुसºया दिवशीही सुरूच असून दुपारी साडेबारापर्यंत १५० अतिक्रमण हटविण्यात आलेय या दरम्यान टॉवर चौक परिसरात किरकोळ वाद झाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वादावर पडदा पडला.
मनपा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीमेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच कोर्ट चौकातील ३१ अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान, अनधिकृत दुकानधारकांनी मनपाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारवाई न करण्याची मागणी केली. तसेच कारवाई केल्यास जेसीबी खाली येवून जीव देण्याचा इशारा दुकानदारांनी दिला. मनपा कर्मचाºयांनी विरोध करणाºया दुकानदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदार ऐकण्याचा स्थितीत नव्हते.
अतिक्रमण कारवाईसाठी एकूण ५ पथक स्थापन करण्यात आले असून, गुरुवारी एकूण २५० दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३१ दुकाने भूईसपाट करण्यात आली तर ३ दुधाचे बुथ देखील पाडण्यात आली. सकाळी ९ वाजता कारवाईला सुरुवात झाली. तर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.
तहसील कार्यालय परिसरातील दुकानांवर टाच
शुक्रवारीदेखील अतिक्रमण कारवाई सुरु करण्यात आली. शहरातील तहसील कार्यालय परिसर, शास्त्री टॉवर चौक इत्यादी भागातील अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त आहे.

Web Title: Encroachment eradication campaign in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव