जळगावच्या कॅन, पाउचमधून देशभरात पोहोचते खाद्यतेल; उद्योग भरारी

By विजय.सैतवाल | Published: April 2, 2023 04:54 PM2023-04-02T16:54:49+5:302023-04-02T16:54:56+5:30

दररोज ५० हजार पाउच, तर २० हजार कॅनची निर्मिती

Edible oil reaches all over the country from cans and pouches of Jalgaon Industry | जळगावच्या कॅन, पाउचमधून देशभरात पोहोचते खाद्यतेल; उद्योग भरारी

जळगावच्या कॅन, पाउचमधून देशभरात पोहोचते खाद्यतेल; उद्योग भरारी

googlenewsNext

जळगाव - घर असो की खाद्यपदार्थाचा व्यवसाय, अशा प्रत्येक ठिकाणी खाद्यतेल जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच त्याची पॅकिंग होऊन व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी पोहोचणेही गरजेचे असते. अशा पॅकिंगसाठी जळगावात दररोज हजारो कॅन, पाऊच आकाराला येत आहेत. यामधून केवळ जळगाव जिल्हा, खान्देश नव्हे तर संपूर्ण देशभरात तेल पोहोचत आहे.

अबब... दररोज ५० हजार पाउच निर्मिती
तेलाच्या पॅकिंगसाठी दर्जेदार प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या पाउचची संख्या दररोज ५० हजारांच्या घरात आहे. या सोबतच कॅनची संख्यादेखील मोठी असून दररोज २० हजारांपर्यंत कॅनची निर्मिती केली जाते.

मुंबई सर्वात मोठी बाजारपेठ
या पाउच, कॅनची मुंबई सर्वात मोठी बाजारपेठ असून त्या खालोखाल दक्षिण भारताची बाजारपेठ आहे. या शिवाय देशाच्या सर्वच भागांत हे पाउच, कॅन पोहोचतात.

अत्याधुनिक मशिनरी व दर्जामुळे पसंती
जळगावात हा उद्योग सुरू झाला त्यावेळी एक मशिनरी होती. त्यानंतर ही संख्या वाढत जाण्यासह त्यात आधुनिकीकरण येऊन पाउच व कॅन निर्मितीचे प्रमाणही वाढत गेले. शिवाय तयार होणाऱ्या पाउच, कॅनसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया करून त्यांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जातो. त्यामुळे येथील या वस्तूंना पसंती वाढली.

५ मेट्रिक टन कच्चा माल
जळगावात तयार होणाऱ्या या वस्तूंसाठी दररोज पाच मेट्रिक टन कच्च्या मालाची आवश्यकता असते.

१०० जणांच्या हाताला काम
या उद्योगाच्या माध्यमातून १०० जणांच्या हाताला काम मिळाले आहे. शिवाय माल वाहतूक व अन्य कामांसाठीदेखील मनुष्यबळाचा वापर होत असल्याने त्यांनाही अप्रत्यक्षरीत्या काम मिळाले आहे.

२३ वर्षांपासून भरभराट
पॅकिंग तेलाला पसंती वाढत गेल्याने त्यासाठी पाउच व कॅनला मागणी वाढली व त्यामुळे २३ वर्षांपासून या उद्योगाने झेप घेतली आहे.

५ लिटरच्या कॅनला सर्वात जास्त मागणी
जळगावात दोन ते १५ लिटरच्या कॅन तयार होतात. त्यात पाच लिटरच्या कॅनची सर्वात जास्त निर्मिती होते.

खाद्यतेलाच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या पाउच, कॅनला दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने या उद्योगाने प्रगती साधली आहे. शिवाय त्यात आधुनिक हायटेक मशिनरींचा वापर होऊ लागल्याने निर्मितीचे प्रमाणही वाढले. देशाच्या सर्वच भागांत पाउच, कॅन पोहोचतात.
- सुनील शहा, उद्योजक.

Web Title: Edible oil reaches all over the country from cans and pouches of Jalgaon Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.