एकवेळचे जेवण करु नका, मात्र मुलांना शिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:20 PM2018-08-27T14:20:36+5:302018-08-27T14:24:14+5:30

Do not feed one time, but educate children | एकवेळचे जेवण करु नका, मात्र मुलांना शिक्षण द्या

एकवेळचे जेवण करु नका, मात्र मुलांना शिक्षण द्या

Next
ठळक मुद्देकाकर समाजाच्या मेळाव्यात ठरावराज्याध्यक्षपदी बिलाल काकर यांचे प्रतिपादनमेळाव्यात सात महत्त्वपूर्ण ठराव

जळगाव : समाजातील मुलांना उच्च शिक्षण देऊन चांगल्या पदावर जाता यावे, त्यासाठी एकवेळ जेवण करु नका परंतू आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्या, असा ठराव काकर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात करण्यात आला़ हा मेळावा रविवारी दुपारी काट्टयाफाईल परिसरातील नॅशनल हॉल येथे पार पडला़
राज्यस्तरीय मेळाव्यात पुणे, नाशिक, धुळे, तसेच सटाणा यासह विविध ठिकाणाहून समाजातील पदाधिकारी उपस्थित होते़ मेळाव्याच्या सुरूवातीला काकर समाजाच्या राज्याध्यक्षपदी वैजापूर येथील बिलाल काकर यांची तर संस्थापक अध्यक्ष म्हणून निजाम काकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली़ सोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा अधिकारही त्यांना देण्यात आला़
मेळाव्यात सात महत्वपूर्ण ठराव
चर्चेअंती सात ठराव मेळाव्यात करण्यात आले़ त्यात समाजातील मुलांना शिक्षण द्यावे, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणे, साखरपुडा व लग्न समारंभात कमी खर्च करणे, विधवा महिलांना रोजगार मिळवून देणे, प्रत्येक जिल्ह्यात समाजाची परिस्थिती हालाखीची असून याबाबत सर्व्हे करून उपाययोजना करणे, जिल्हा, तालुकास्तरीय कमिटी स्थापन करणे, शैक्षणिक समिती तयार करण्यासह होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, असा ठराव करण्यात आला़ सूत्रसंचालन मुश्ताक करिमी व ईस्माईल सुलेमान यांनी केले़

Web Title: Do not feed one time, but educate children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव