‘सरपंच अवॉर्ड’चे उद्या होणार थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:22 AM2019-02-22T11:22:53+5:302019-02-22T11:23:25+5:30

प्रत्येक गावाला उत्सुकता

Distribution of 'Sarpanch Award' will be held tomorrow | ‘सरपंच अवॉर्ड’चे उद्या होणार थाटात वितरण

‘सरपंच अवॉर्ड’चे उद्या होणार थाटात वितरण

Next
ठळक मुद्दे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा




जळगाव : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे शनिवार २३ फेब्रुवारी रोजी जळगावच्या रिंगरोडवरील यशोदया सभागृहात सकाळी ११ वाजता वितरण होणार आहे.
जळगावात १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली. या ज्युरी मंडळामध्ये वीज वितरण कंपनीतील निवृत्त अभियंता यु.डी.चौधरी, राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंके, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, जिल्हा रुग्णालयातील आरएमओ डॉ. विजय जयकर, मनपा अभियंता प्रकाश पाटील, वडगावच्या माजी सरपंच विजया पाटील, सर्पमित्र वासुदेव वाढे, प्राचार्य डॉ. यशवंत महाजन, एरंडोल येथील प्रगतीशील शेतकरी शालिक गायकवाड, अ‍ॅड. विश्वासराव भोसले अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
गावाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहे. सलग दुसºया वर्र्षीही या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.

११ कॅटेगरीत देणार सरपंचांना पुरस्कार
सरपंचांनी गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन - लोकसहभाग, रोजगार व कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरंपच आॅफ द ईयर हे दोन पुरस्कारांचेही वितरण होईल.

Web Title: Distribution of 'Sarpanch Award' will be held tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.