वाकोद रस्त्यावर धुळीमुळे शेतमालाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 09:36 PM2018-11-06T21:36:18+5:302018-11-06T21:39:04+5:30

वाकोद ते पहूर दरम्यान तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात धुळ उडत असल्याने शेतमालाचे नुकसान होत आहे.

Damage to the farm due to dust on the Wakod road | वाकोद रस्त्यावर धुळीमुळे शेतमालाचे नुकसान

वाकोद रस्त्यावर धुळीमुळे शेतमालाचे नुकसान

Next
ठळक मुद्देकापसावर धुळ बसल्याने शेतात मजूर कामाला येईनाशेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणीसततच्या धुळमुळे कपाशीची वाढ खुंटली

वाकोद, ता. जामनेर : वाकोद ते पहूर दरम्यान तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात धुळ उडत असल्याने शेतमालाचे नुकसान होत आहे. पिकांवरील धुळीमुळे कापूस वेचणी व अन्य कामांसाठी मजुर मिळत नसल्याने शेतमालक हैराण झाले आहेत. संबधित ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
फदार्पुर पर्यंत हे काम सध्या सुरू आहे. वाकोद ते पहुर यादरम्यान रस्त्याचे दुतर्फा काम सुरू आहे. सध्या असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १५ ते २० फुटांपर्यंत मुरूम व माती टाकून वाढीव रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच या ९ कि.मी. अंतरात सात ते आठ ठिकाणी मोºया बनविण्याचे काम सुरू आहे. मोºया बनविण्याच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत चालावी यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावरून दिवसरात्र वाहतुक सुरू असते. कच्च्या रस्त्यावरून सतत मातीची धुळ उडून आजूबाजूच्या शेतातील पिकावर जाऊन बसत आहे. त्यामुळे कपाशीच्या कैºयावर बसत असल्याने अक्षरश: धुळीने माखलेले आहे. या मुळे कपाशी पिकावरील कैºयांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे कापूसदेखील येत नसल्याने पिकावर दुष्परिणाम होत आहे.
 

Web Title: Damage to the farm due to dust on the Wakod road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.