प्राध्यापकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जैताणे येथील ८ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:58 PM2019-02-08T22:58:37+5:302019-02-08T22:58:52+5:30

जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील रहिवासी

The crime against 8 people in Jaitane for motivating the professor to commit suicides | प्राध्यापकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जैताणे येथील ८ जणांविरुद्ध गुन्हा

प्राध्यापकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जैताणे येथील ८ जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

पहूर, ता. जामनेर - जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील रहिवासी असलेले प्रा. मदनसिंग सुपडू राठोड (४९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पहूर पोलिसात धुळे जिल्ह्यातील जैताणे येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनसिंग राठोड हे निजामपूर ते जैताणे दरम्यान (ता. साक्री) असलेल्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करून ते देऊळगाव गुजरी येथे घरी आले होते. यादरम्यान उसनवारीच्या पैशावरून निजामपूर जैताने येथून काही लोक भ्रमध्वनीकरून पैशांसाठी तगादा लावून दमदाटी, जिवे मारण्याची धमकी व शिविगाळ करीत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून मदनसिंग राठोड यांनी ३ रोजी देउळगाव गुजरी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असा राठोड यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या प्रकरणी मदनसिंग राठोड यांच्या पत्नीने शुक्रवारी पहूर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून योगेश न्याहाळदे, कैलास बोरसे, कैलास शिरोडे, नारायण काटके, प्रदीप माळी, जयदेव भिला, भिका रत्नपारखे, प्रदीप बाबुलाल गवळी, सर्व रा. जैताणे, ता. साक्री यांच्याविरुद्ध भादंवि ३०६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक किरण बर्गे करीत आहे.

Web Title: The crime against 8 people in Jaitane for motivating the professor to commit suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव