१५ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:31 AM2019-02-16T01:31:59+5:302019-02-16T01:36:48+5:30

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी भावात मूग खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीतील १५ व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत.

 Court orders to register cases against 15 merchants | १५ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

१५ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देहमीभावापेक्षा कमी भावाने केली होती मूग, उडदाची खरेदीगावरान जागल्या संघटनेने न्यायालयात घेतली होती धाव

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी भावात मूग खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीतील १५ व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथम न्यायदंडाधिकारी (वर्ग १) वाय. जे. वळवी यांनी दिले आहेत. सदर आदेशात ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने सूचित केले आहे.
याबाबत राष्ट्रीय किसान संघाचे अध्यक्ष व गावरान जागल्या संघटनेचे कार्यकारी सदस्य अरुण बाबूराव देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्चतम दर्जाचा (एफएक्यू) माल असूनही त्यांचा उडीद, मूग हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्यात आला होता. याबाबत तालुक्यातील गावरान जागल्या सेनेसह शेतकºयांनी सहाय्यक निबंधक व सचिवांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र दखल न घेतली गेल्याने याबाबत दावा न्यायालयात दाखल केला होता.
काय दिले आहे तक्रारीत
सन २०१७- १८ च्या पावसाळी हंगामात निघालेल्या उडीद, मुगास फिर्यादीसह अन्य विविध गावातील शेतकºयांनीही कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केले असता सदरच्या उच्च प्रतीच्या उडीद व मुगास केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत दराने म्हणजेच अनुक्रमे ५४००/- रुपये ते ५५७५ रुपयांप्रमाणे खरेदी करणे संबंधीत आरोपी आडत व्यापाºयांवर बंधनकारक असतांनाही आरोपींनी सध्या १७००- ते ४५००- रुपये प्रति क्विंट्ल असा दर सुरू आहे असा विश्वास देवून फिर्यादी आणि अन्य अनेक शेतकयांकडून उच्च प्रतीच्या शेतमालास अत्यंत कमी दराने खरेदी करून शेतकºयांची संगनमताने फसवणूक केली आहे. हे करतांना त्यांनी सदर शेतकºयांना उच्च प्रतिच्या शेतमालास विश्वासघात करून फसवणुकीने खरेदी करतांना बोगस बिले सुध्दा तयार करून दिली आहेत.
सदरच्या बिलांवर जर शेतमाल उच्च प्रतीचा नसेल व तो हलक्या प्रतीचा असल्यास नॉन एफएक्यू असा शिक्का मारला जातो. मात्र फिर्यादी व इतर शेतकºयांना नॉन एफएक्यूचे शिक्के न मारता दर्जाचे कोणतेही शिक्के पावत्यांवर दिसून आले नाही. त्यामुळे आडते आणि व्यापारी यांनी संगनमताने चांगल्या प्रतीचा हा माल नियमांनुसार एफएक्यू असतांना देखील त्याला किमान आधारभूत भाव न देता माल खरेदी केला. या प्रकरणी विविध ठिकाणी तक्रारी पाठपुरावा करूनही याबाबत शासकीय यंत्रणांनी कारवाई केली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती., आणि आता त्यामुळे न्यायालयाने १५ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
यांच्याविरूद्ध आहे तक्रार
भवलक्ष्मी एजन्सीचे नितू हर्ष जैन, श्रद्धा एजन्सीचे सुरेखा पूनमचंद छाजेड द्वारा रमेशचंद छाजेड, एच.बी.चे हरी भिका वाणी, देवराज प्रसन्न बाफना, निशांतचे संगीता विजय पारख, संपतलाल अगरचंदचे हर्षकुमार प्रकाशचंद जैन, व्ही. बी. एजन्सीचे विजय गुलाबचंद बाफना, समर्थ एजन्सीचे हेमलता देवराज बाफना, नर्मदाचे महेंद्र मोहनलाल जैन, साईकृपाचे वृषभ प्रकाश पारख, ओमश्रीचे योगेश चुडामण शेटे, बी.टी. एजन्सीचे शंंकरलाल तेजुमल बितराई, लामा एजन्सीचे विनोदकुमार कांतीलाल कोठारी, चितसीयाचे शेखर कौसर अहमद शेख रियाजोद्दीन, भगवतीचे शंकरलाल तेजुमल बितराई यांचा समावेश आहे. हे सर्व बाजार समितीतील परवानाधारक व्यापारी आहेत. भा.दं.वि.कलम १९९, ४२०, ४६४, ४६८, व ३४ प्रमाणे दावा दाखल करण्यात आला होता. त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title:  Court orders to register cases against 15 merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार