गाडीने मार्ग बदलल्याने प्रवाशांना जोधपूरऐवजी पोहचविले नागौरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:27 AM2019-02-04T11:27:51+5:302019-02-04T11:28:40+5:30

जळगावच्या प्रवाशाला संतापजनक अनुभव

Changing the way of the train, the passengers reached Jodhpur instead of Nagaur | गाडीने मार्ग बदलल्याने प्रवाशांना जोधपूरऐवजी पोहचविले नागौरला

गाडीने मार्ग बदलल्याने प्रवाशांना जोधपूरऐवजी पोहचविले नागौरला

Next
ठळक मुद्दे नांदेड-बिकानेर एक्सप्रेस पालनपुरमार्गे न जाता गेली दुसऱ्याच मार्गाने, रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार



जळगाव : जळगावमार्गे जोधपूरला जाणारी नांदेड-बिकानेर एक्सप्रेस पालनपुरमार्गे जोधपूरला न जाता अन्य मार्गाने नेऊन प्रवाशांना नागौरला उतरविण्यात आले. विशेष म्हणजे बदलण्यात आलेल्या मार्गाबद्ल प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. शेवटी नागौरला उतरुन प्रवाशांना दुसºया वाहनाने जोधपूरला जावे लागल्याचा प्रकार १ जानेवारी रोजी घडला.
जळगाव येथील साहित्यिक सतीश जैन यांना रेल्वेच्या या मनमानी कारभाराचा फटका बसला. त्यामुळे त्यांच्यासह आई-वडिल व कुटुंबाचे हाल झाले.
या संदर्भात सविस्तर असे की, ३१ जानेवारी रोजी जळगावचे सतीश जैन हे जोधपूरला जाण्यासाठी( गाडी क्रमांक-१७६२४ ) नांदेड बिकानेर एक्सप्रेस या गाडीत बसले. सुरतपर्यंत हे सर्व प्रवासी गाडीत जागे होते. सकाळी या प्रवाशांना रतलाम स्टेशनावर गाडी थांबलेली दिसली. या गाडीच्या मार्गावर कुठेही रतलाम स्टेशन येत नसल्याने, या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांनी तात्काळ दुरध्वनीवरुन रेल्वेच्या चौकशी केंद्राकडे चौकशी केली. यावर त्यांना गाडी तिच्या मार्गावर योग्य जात असल्याचे उत्तर मिळाले, तसेच या प्रवाशांना जवळील स्टेशनवर संपर्क साधण्याची सूचना केली.
यानंतर गाडी अजमेर स्टेशनला आल्यावर या प्रवाशांनी स्टेशनवर चौकशी केली असता या ठिकाणी त्यांना गाडीच्या मार्गाबद्दल कुठलीही माहिती मिळाली नाही. पुढे फुलोरा स्टेशनवर गाडी आल्यावर या प्रवाशांनी चहा विक्रेत्याकडे चौकशी केली असता, त्याने ही गाडी जोधपूरला जात नसल्याचे सांगितल्यावर, प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. या प्रवाशांमध्ये वयोवृद्ध माणसे, महिला पुरुष व लहान मुलेदेखील होते. गाडी चुकीच्या मार्गाने जात असल्यामुळे या २० ते २५ प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे गाडीतील बहुतांश प्रवासी खाली उतरुन गेले होते.
हे प्रवासी जळगावहून गाडीत बसल्यावर तपासणीसाठी आलेल्या तिकीट निरीक्षकानेदेखील ही गाडी जोधपूरला जाणार नसल्याची कुठलीही माहिती दिली नाही. यानंतर ही गाडी रात्री आठच्या सुमारास नागौर स्टेशनला आली. या ठिकाणी तक्रार देण्यासाठी प्रवाशी स्टेशन मास्तरकडे गेले असता, स्टेशन मास्तरांनी तक्रार पुस्तक देण्यास टाळाटाळ करुन प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली. रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविषयी प्रवाशांती तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कडक आवाजात बोलल्यावर मिळाले तक्रार पुस्तक
1 हे प्रवासी स्टेशन मास्तरकडे झालेल्या त्रासाबद्दल तक्रार करण्यासाठी गेले असता, स्टेशन मास्तराने त्यांचे काहीच ऐकुन न घेता पुस्तक देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्रवासी अधिकच संतप्त झाले होते. यावेळी सतीश जैन हे स्टेशन मास्तराशी कडक आवाजात बोलल्यावर तक्रार पुस्तक देण्यात आले.
2 दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जैन व इतर प्रवाशांचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. गाडीच्या मार्गावरील असलेल्या तांत्रिक अडचणी संदर्भात या प्रवाशांना जळगाव स्थानकावर तिकीट निरीक्षकाकडूनही कुठलीही माहिती मिळाली नाही. गेल्या १४ वर्षांपासून हे प्रवासी जळगावहुन नेहमी जोधपुरला जात असतांना, असा त्रास या पूर्वी कधीही सहन करावा लागला नव्हता.यामुळे एका प्रवाशाची तब्येत देखील बिघडली.
3 ऐन थंडीत जळगावच्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Changing the way of the train, the passengers reached Jodhpur instead of Nagaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.