सीसीआयने गाशा गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:23 AM2019-03-11T11:23:16+5:302019-03-11T11:23:23+5:30

शेतकऱ्यांनी केंद्रावर फिरवली पाठ

CCI wrapped up the gaasha | सीसीआयने गाशा गुंडाळला

सीसीआयने गाशा गुंडाळला

Next
ठळक मुद्देहमीभावापेक्षाही कमी दराने घेतला जात होता माल



जळगाव : सीसीआयने (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) राज्यातून कापूस खरेदीची प्रक्रिया थांबवली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन केंद्रावरील कापूस खरेदी शनिवारपासून बंद केली आहे. यंदा शासनाने निश्चित केलेला ५४५० प्रतीक्विंटल इतका हमीभाव देऊनही शेतकऱ्यांनी सीसीआयच्या केंद्राकडे पाठ फिरवली. मालच येत नसल्याने अखेर सीसीआयने आपल्या केंद्रावरील खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सीसीआयने यंदा राज्यभरात ६४ कापूस केंद्र सुरु केले होते. त्यात जिल्ह्यात ३ केंद्र सुरु होते. डिसेंबर महिन्यात सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली.
मात्र, कापूस खरेदी दरम्यान अनेक अटी व नियम असल्याने शेतकऱ्यांचा माल हा हमीभावापेक्षाही कमी दरात म्हणजे ५ हजार ते ५३०० रुपयांमध्येच घेतला जात होता.
त्यामुळे शेतकºयांनी सीसीआयकडे माल विक्री करण्यापेक्षा खासगी व्यापाºयांनाच माल देणे पसंत केले. त्यामुळे सीसीआयच्या कें द्रावर ५० हजार क्विंटलपर्यंतची खरेदी होवू शकली.
सीसीआयची स्थिती पाहता पणन महासंघाने यंदा कापूस खरेदी करणे टाळले.
कापसाच्या दरात वाढ
आंतरराष्टÑीय बाजारात मागणी नसल्याने कापसाच्या दरात यंदा घट पहायला मिळाली. त्यामुळे शेतकºयांनी जानेवारी अखेरपर्यंत आपला माल बाजारात विक्रीसाठी आणलेलाच नव्हता. मात्र, भाव वाढण्याचा शक्यता मावळल्यानंतर शेतकºयांनी फेब्रुवारी महिन्यापासून कापूस विक्रीस आणायला सुरुवात केली होती. तसेच महिनाभरात ५५०० ते ५६०० प्रतिक्विंटल दर असलेल्या कापूसच्या दरात २०० ते ३०० रुपयांची घट होवून ५२०० ते ५४०० रुपयांपर्यंत कापसाचे दर झाले होते. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत होते. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ झाली असून, कापसाचे दर सध्यस्थितीत ५५५० पर्यंत आले आहेत.

Web Title: CCI wrapped up the gaasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.