पहूरच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:18 PM2021-06-08T23:18:34+5:302021-06-08T23:19:04+5:30

पहूर ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case of molestation against the then medical officer of Pahur | पहूरच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा

पहूरच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा

Next
ठळक मुद्देशिस्तभंगाची कारवाई.

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : येथील ग्रामीण रुग्णालयातील  तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांनी भ्रमनध्वनीवर रुग्णालयातील युवतीला मेसेज पाठविल्याने पहूर पोलिसात त्यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  रुग्णालयातील संबंधित युवतीला  वेळोवेळी  भ्रमनध्वनीवर  ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे हे मेसेजपाठवित  असल्याचे युवतीने  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार डॉ. जितेंद्र वानखेंडे विरुद्ध भादवी ३५४(ड) प्रमाणे विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अमोल देवडे करीत आहे.

शिस्तभंगाची कारवाई 

डॉ. जितेंद्र वानखेडे यांची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी येथे होती. पण पहूर रुग्णालयात डॉक्टर नसल्याने प्रतिनियुक्तीवर वानखेडे दीड वर्षांपासून रुग्णसेवा पुरवित होते. शेंदूर्णी येथे एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर नियुक्त झाल्याने वानखेडेंना गेल्या महिन्यात १८ रोजी कार्यमुक्तचे आदेश जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आहे. पण जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आदेशाचे पत्र पहूर रुग्णालयाला दिले नसल्याचे रुग्णालयाकडून सांगितले आहे.त्यामुळे  पहूर रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ होते.त्यानंतर हा प्रकार १जून रोजी घडला.याची कल्पना संबधीत युवतीने तातडीने वरिष्ठांना २ जून रोजी दिली.त्यानुसार प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दोन रोजी सकाळी रुग्णालयात तातडीने मिटींग घेऊन डॉ. जितेंद्र वानखेडे यांना चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे पत्र काढले.व त्यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे. कार्यमुक्त केल्यावरही डॉ. जितेंद्र वानखेडेंनी पहूर रूग्णालयात सेवा दिली कशी हा प्रश्न उपस्थित झाला असून जिल्हा परिषदेने पत्र रुग्णालयाला का दिले  नाही.हा प्रश्न समोर आला आहे.

बंदीपत्रीत डॉक्टर हजर झाल्यानंतर प्रतिनियुक्तीवर असलेले डॉक्टर वरिष्ठ स्तरावरून शासननिकषानुसार थेट सेवेतून कार्यमुक्त चे आदेश आहे. याबाबत ची माहिती संबधीत विभागांना स्वतंत्र पणे निर्गमित करण्यात येते.
-डॉ. राजेश सोनवणे,  तालुका वैद्यकीय अधिकारी,  जामनेर

Web Title: A case of molestation against the then medical officer of Pahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.