मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ जळगावातून - डॉ. तात्याराव लहाने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 09:38 PM2017-11-20T21:38:44+5:302017-11-20T21:41:03+5:30

18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथून करण्यात येणार आहे.

The campaign for the cataract-free campaign will be started from Jalgaon - Dr. Tatarrao Lahane | मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ जळगावातून - डॉ. तात्याराव लहाने

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ जळगावातून - डॉ. तात्याराव लहाने

Next
ठळक मुद्देमोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ जळगावातूनराज्यात मोतीबिंदूचे सुमारे 17 लाख रुग्णमोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा

जळगाव : येत्या 18 महिन्यात (15 ऑगस्ट 2019 पर्यंत) मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला आहे. या संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नियोजन केले असून पुढील 18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथून करण्यात येणार आहे. या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आज केले.
या मोहिमेच्या शुभारंभनिमित्त करावयाच्या तयारीची आढावा बैठक डॉ. लहाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, रामेश्वर नाईक, पितांबर भावसार, अरविंद देशमुख यांचेसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. लहाने म्हणाले की, राज्यात मोतीबिंदूचे सुमारे 17 लाख रुग्ण आहे. या रुग्णांना दृष्टि देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. हे काम येत्या 18 महिन्यात पूर्ण करावयाचे असून यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून येत्या 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यापासून शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर या तालुक्यातील प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू असेल त्यांना 23 तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख स्वत: करणार आहे. ज्या रुग्णांच्या डोळयात मोतीबिंदू आढळेल त्यांचेवर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करतांना दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.
या नियोजनानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, नर्सींग स्टाप उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र या अभियानाचा शुभारंभ जळगाव जिल्हयातून होत आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे अभियान यशसवीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मुंडके यांनी या बैठकीत दिले. यावेळी रामेश्वर नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

• 15 ऑगस्ट 2019 पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याची मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा संकल्प
• संकल्पाच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर नियोजनाची जबाबदारी
• येत्या 18 महिन्यात राज्यातील 17 लाख रुग्णांवर करणार शस्त्रक्रिया
• जिल्ह्यातील 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन
• डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत स्वत: करणार शस्त्रक्रिया
• दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांवर प्राथम्याने होणार उपचार
• *23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी करण्याचे नियोजन यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात होणार तपासणी

Web Title: The campaign for the cataract-free campaign will be started from Jalgaon - Dr. Tatarrao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव