Bodies found in well | विहिरीत फेकलेल्या बहीण-भावाचे सापडले मृतदेह, जळगाव जिल्ह्यातील घटना
विहिरीत फेकलेल्या बहीण-भावाचे सापडले मृतदेह, जळगाव जिल्ह्यातील घटना

धानोरा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा येथील शेख तनवीर शेख महेबूब (वय साडेतीन वर्ष) व निजबा शेख महेबूब (वय ५) या विहिरीत फेकलेल्या दोघ बहीण भावांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी विहिरीत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी शेख खालीद शेख इस्माईल (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, धानोरा येथील शेख खालीद शेख इस्माईल याने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास बोरं खाऊ घालण्याचे अमिष दाखवून शेख तनवीर शेख महेबूब व निजबा शेख महेबूब शेतात नेऊन या दोघ बहीण-भावांना विहिरीत फेकून दिले होते. आरोपी वारंवार बालके फेकलेल्या जागा बदलून सांगत असल्याने रात्री उशिरापर्यंत बालकांचा शोध लागला नव्हता. ११ रोजी सकाळी धानोरा शिवारातील गट नं ४०४मध्ये अनंत बाजीराव पाटील यांच्या विहिरीवर मुलीची चप्पल सापडल्याने बालकांचा शोध लागला.
या प्रकरणी महेबूबखान हबीबखान, रा. धानोरा यांच्या फिर्यादीवरून अडावद पो .स्टेला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.


 


Web Title: Bodies found in well
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.