बालगंधर्वांनी पूर्ण प्रयोगाचे मानधन दिले ब्राह्मण सभेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:31 PM2019-06-26T12:31:38+5:302019-06-26T12:31:46+5:30

बालपण घालविलेल्या जळगावच्या ऋणानुबंधातून इमारत बांधकामासाठी मदत

Balgandharva lauded the full experiment in Brahmin meeting | बालगंधर्वांनी पूर्ण प्रयोगाचे मानधन दिले ब्राह्मण सभेला

बालगंधर्वांनी पूर्ण प्रयोगाचे मानधन दिले ब्राह्मण सभेला

googlenewsNext

जळगाव : आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी गाजविणारे अभिनेते, निर्माते, गायक नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी शहरातील ब्राह्मण सभेच्या इमारत बांधकामासाठी आर्थिक सहाय्य केल्याच्या आठवणी आहे़
बालगंधर्व यांनी १९२९ साली एका नाटकाच्या प्रयोगाचे पूर्ण मानधन या इमारतीच्या बांधकामाला दिले होते़ १ हजार ८८० रूपये १२ आणे ऐवढे ते मानधन होते़ बालगंधर्व यांचा बुधवार, २६ जून रोजी जन्मदिवस असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या आठवणी जाणून घेतल्या असता ब्राह्मण सभेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती मिळाली़
तहसील कार्यालयाच्या पाठीमागे ब्राह्मण सभेचे सभागृह असून भव्य इमारत आहे़ या इमारतीच्या कोनशीलेवर या मदतीचा उल्लेख करण्यात आला असून हा उल्लेख आजही बालगंधर्व यांच्या आठवणींनी उजाळा देत असतो.
काय आहे कोनशिलेवर ?
या इमारतीच्या बांधकामासाठी बागंधर्व नाटक मंडळीचे मालक श्री नारायणराव राजहंस आणि बंधू यांनी त्यांचे पितृतुल्य पुरस्करर्ते कै़ आबासाहेब म्हाळस यांच्या चिरस्मरणार्थ रूपये हजार १८८० रूपये १२ आणे अर्पण केले आहे़ मिती चैत्र शुद्ध प्रतिप्रदा, शके १८५१, इ़ स१९२९ असा उल्लेख आहे़ ही कोनशीला दर्शनी भागावरच असून ती येणाºया जाणाऱ्यांना बालगंधर्व यांच्या दातृत्वाचे दर्शन घडविले.
पत्रातून देणगीचा मनोदय
बालपण जळगावात गेल्याने व येथे प्राथमिक शिक्षणासह संगीताचे धडे घेतल्याने जळगावशी असलेल्या ऋणानुबंधातून येथे मदत करण्याचा मनोदय बालगंधर्व यांनी व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी त्यांचे मामेभाऊ डॉ. सदाशिव म्हाळस यांना पत्र देऊन मामा आबाजी म्हाळस यांच्या नावाने संगीत भवन उभारण्याविषयी कळविले होते. त्यानुसार आबाजी म्हाळस यांच्या नावाने ब्राह्मण सभेला एक हजार ८८० रुपये १२ आणे देणगी दिली. या देणगी नंतर ब्राह्मण सभेच्या बांधकामास सुरुवात झाली. संगीत भवन मात्र राहून गेले.

Web Title: Balgandharva lauded the full experiment in Brahmin meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव