वाकोद येथे सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 12:37 PM2021-08-14T12:37:03+5:302021-08-14T12:37:43+5:30

चार चाकी गाडी घटनास्थळी सोडून चोरटे पसार झाले.

Attempts to blow up a goldsmith's shop at Wakod failed | वाकोद येथे सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

वाकोद येथे सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

googlenewsNext


अर्पण लोढा
वाकोद, ता. जामनेर : येथील भर बाजारपट्टा व वस्तीत असलेल्या हितेश शंकरलाल जैन यांच्या मालकीचे हितेश ज्वेलर्स शटर कापून धाड़सी चोरी करण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी मध्य रात्री ही घटना घडली. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटयांनी आपल्याकड़े असलेले चारचाकी वाहन घटनास्थळी सोडून गेले आहे. चोरीच्या बहाण्याने आलेल्या चोरटयांच्या गाड़ीमध्ये लोखंडी टॉमी, आणि मोठा घनदेखील आढळून आला आहे.
भर चौकात असलेल्या हितेश ज्वेलर्सच्या रोलिंग शटरच्या लोखंडी लॉक पट्टया कापण्यात आल्या आहे व शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता डाव फसला. भर चौकात धाड़सी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गामध्ये घबराट निर्माण झाली आहे. हितेश ज्वेलर्स समोर चोरटयांनी टाटा इंडिका (एम. एच. २० - बी. एन. ३८२७) या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची गाड़ी लावलेली दिसून आली या गाड़ी मध्ये लोखंडी टॉमी व घन आढळून आल्याने चोरटे धाड़सी चोरी च्या प्रयत्नत होते.
शनिवारी सकाळी घटनास्थळी पहुर पोलिसांनी माहीती घेऊन घटनास्थळी आढळून आलेली बेवारस चारचाकी ताब्यात घेतली असून तपास सुरु केला आहे.
वाहन चोरीचे की काय?
शुक्रवार रोजी मध्यरात्री येथील हितेश ज्वेलर्स शेटर कापून फोड़ण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला या चोरीसाठी आलेल्या चोरटयांनी चारचाकी गाड़ी वापरली असून ही गाड़ी घटनास्थळी जागेवर गाड़ी बेवारस सोडून गेले आहे.
या गाड़ीमध्ये लोखंडी टॉमी आणि घन आढळून आले असल्याने ही गाड़ी चोरटयांची असल्याची खात्री होते सदर गाड़ी ही घटनास्थळी सोडल्याने ही गाड़ीदेखील चोरी ची आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोऱ्याचे वाढत प्रमाण लक्षात घेता रात्रीची गस्ती घालविण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.

Web Title: Attempts to blow up a goldsmith's shop at Wakod failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.