जळगावात खगोल प्रेमींनी घेतला चंद्रग्रहणाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 07:23 PM2018-07-28T19:23:27+5:302018-07-28T19:25:31+5:30

पहाटे पावणे पाचपर्यंत चालेल्या चंद्रगहणानाचा खगोलप्रेमींनी दुर्बिणीच्या साहाय्याने आनंद घेतला.

Astro lovers take the joy of the crescendo in Jalgaon | जळगावात खगोल प्रेमींनी घेतला चंद्रग्रहणाचा आनंद

जळगावात खगोल प्रेमींनी घेतला चंद्रग्रहणाचा आनंद

Next
ठळक मुद्देजळगावात पहाटेपर्यंत दिसले चंद्रग्रहण२१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहणखगोलप्रेमींसह नागरिकांनी घेतला आनंद

जळगाव : २१ व्या शतकातील सर्वांत मोठ्या खग्रास चंद्रग्रहणाला शुक्रवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुरु झाले. पहाटे पावणे पाचपर्यंत चालेल्या चंद्रगहणानाचा खगोलप्रेमींनी दुर्बिणीच्या साहाय्याने आनंद घेतला.
शुक्रवारी रात्री ठीक ११ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रावर पृथ्वीची सावली पडून, रात्री १ वाजता पर्यंत चंद्र पूर्ण गडद सावलीत आला होता. त्यानंतर २ वाजून ४३ मिनिटांनी गडद सावलीतून विरळ सावलीत प्रवेश केला. पहाटे पावणे पाच वाजता चंद्रग्रहण संपले.
जळगावकरांना व खगोल प्रेमींना हे खग्रास चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी महाबळ कॉलनीतील चिन्मय बारुदवाले यांच्या निवासस्थानी दुबिर्णीद्वारे पाहण्याची व्यवस्था केली होती. यावेळी प्रवीण बारुदवाले, नेहा बारुदवाले, इमरान तडवी आदी खगोलप्रेमींनी चंद्रग्रहणाचा आनंद घेतला.

Web Title: Astro lovers take the joy of the crescendo in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव