रावेर येथे १० हजार रुपयांची लाच घेतांना फौजदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:49 PM2017-12-07T17:49:39+5:302017-12-07T17:54:28+5:30

निकाळजे यांच्या बंगल्याच्या शेजारील बांधकामाजवळ केली कारवाई

arrested in connection with a bribe of Rs 10,000 | रावेर येथे १० हजार रुपयांची लाच घेतांना फौजदारास अटक

रावेर येथे १० हजार रुपयांची लाच घेतांना फौजदारास अटक

Next
ठळक मुद्देगुरुवारी दुपारी साडेतीन वाजता केली अटकनिकाळजे यांच्या बंगल्यांच्या बांधकाम स्थळी कारवाई गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू

आॅनलाईन लोकमत
रावेर,दि.७ : राजस्थान पासिंगच्या मार्बल व कोटा वाहतूक करणाºया चालकाकडून १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने फौजदार प्रवीण निकाळजे याला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ अटक केली.
निरूळ येथील रहिवासी विनायक धनसिंग पाटील यांच्या पूर्वी खानापूर नजीक बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील ढाबा व्यवसायातून राजस्थानमधून मार्बल व कोट्याच्या मालाची अवजड हाफबॉडी ट्रकने वाहतूक करणाºया ट्रकचालकांशी ओळख झाल्याने त्यांच्या वाहतुकीत अडचण निर्माण झाल्यास ती सुकर करून देण्याची मदत ते करीत असत.
दरम्यान, गत पाच - सहा महिन्यांपासून मार्बल व कोटा वाहतूक करणाºया ट्रकचालकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडण्याचे काम सुरू होते. मंगळवारी मार्बल कोटा वाहतूक करणाºया आर. जे.- ०२ पासिंगच्या हाफबॉडी ट्रकचालकांकडून रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे यांनी दहा हजार रुपयांची लाच ट्रक चालकांचा मध्यस्थ विनायक धनसिंग पाटील (रा निरूळ ता रावेर) यांचेकडे मागितली होती.
विनायक पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. उपअधीक्षक ठाकूर यांनी पथकासह गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ठरल्याप्रमाणे फियार्दीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना फौजदार प्रवीण निकाळजे यांच्यावर छापा घालून रंगेहाथ पकडले. येथील तडवी कॉलनीत फौजदार निकाळजे यांच्या बंगल्यांच्या बांधकाम स्थळी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी शासकीय विश्रामगृहात जाबजबाब नोंदवण्याचे व गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Web Title: arrested in connection with a bribe of Rs 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.