अपु:या कृषी संशोधनामुळे दुप्पट शेती उत्पन्नाचे स्वप्न कसे पूर्ण होणार

By admin | Published: April 5, 2017 04:51 PM2017-04-05T16:51:52+5:302017-04-05T16:51:52+5:30

संशोधनाबाबत फारशी प्रगती नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील पाच वर्षात शेती उत्पादन दुप्पट करण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल, असा सवाल कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ यांनी केला.

Apu: This agricultural research will fulfill the dream of doubling agriculture income | अपु:या कृषी संशोधनामुळे दुप्पट शेती उत्पन्नाचे स्वप्न कसे पूर्ण होणार

अपु:या कृषी संशोधनामुळे दुप्पट शेती उत्पन्नाचे स्वप्न कसे पूर्ण होणार

Next
>कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ : लहान कोरडवहू शेतक:यांसाठी यंदा अॅक्शन प्लॅन
जळगाव,दि.5- आपला परिसर विविध पिकांच्या उत्पादनात अग्रेसर आहे, पण उत्पादकतेमध्ये आपण मागे आहोत. शेतक:यांना समृद्ध करायचे असेल तर विविध पिकांचे संशोधन व क्षेत्र हे वाढायला हवे. पण संशोधनाबाबत फारशी प्रगती नाही, आपण अपुरे पडत आहेत, असे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील पाच वर्षात शेती उत्पादन दुप्पट करण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल, असा सवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ यांनी बुधवारी निमखेडीलगतच्या तेलबिया संशोधन केंद्रात आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात शास्त्रज्ञ, शेतकरी यांना केला. 
पानवेल संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पानवेलींची स्थिती व सुधारित तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर आयोजिण्यात आले. त्यात जिल्हाभरातील ठिकठिकाणचे पानवेल उत्पादक सहभागी झाले. 
व्यासपीठावर कुलगुरू डॉ.विश्वनाथ यांच्यासह कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ.किरण कोकाटे, बंगळुरू येथील  इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ हॉर्टीकल्चर रिसर्चचे शास्त्रज्ञ डॉ.हेमा बिंदू, एम.ए.सूर्यनारायणन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.विवेक सोनवणे होते. तर तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सुदाम पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कापूस पैसादसकार डॉ.संजीव पाटील आदी उपस्थित होते. 
पिक विमा योजनेत पानांचा समावेशासाठी प्रस्ताव
पानवेलींना शेतकरी देव मानतात. अनेक शेतकरी पादत्राणे परिधान करू पानमळ्य़ात जात नाहीत. पण पानवेलींचे जिल्ह्यातील क्षेत्र फक्त 200 हेक्टर आहे. ते वाढायला हवे. पीक विमा योजनेमध्ये पान वेलींचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव शासनाला दिला जाईल. औषधी वनस्पती म्हणून पानवेलींवर संशोधनासंबंधी कार्यवाहीला गती देऊ. गटशेतीमधून पानवेलींना प्रोत्साहन मिळावे. पानवेलींमध्ये आंतरपीक घेता येईल का, याचाही विचार करावा. पानवेल संशोधन योजनेला बळकटी मिळण्यासाठीही शासनाला प्रस्ताव सादर करू, असेही डॉ.विश्वनाथ म्हणाले. 
कोरडवाहू शेतीसाठी अॅक्शन प्लान
पानवेल संशोधन कार्यासंबंधी गठीत समितीमध्ये माझाही समावेश आहे. ही समिती लवकरच शासनाला अहवाल सादर करणार असून, त्यामध्ये पानवेल विकासासंबंधी अनेक बाबींचा अंतर्भाव केला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ.विश्वनाथ पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व इतर यंत्रणा मिळून गठीत केलेली समिती लवकरच कोरडवाहू शेतीबाबतचा अॅक्शन प्लान शासनाला देणार आहे. या खरिपात हा प्लान शेतक:यांसाठी अमलात येईल. त्यात सीताफळ, डाळींब शेतीसोबतच बकरी पालन, व्हर्मी कंपोस्ट आदी प्रकल्पांचा समावेश असेल.
कृषी महाविद्यालय जळगावात
जिल्ह्यातील कृषी विस्तार कार्य व शिक्षण यासंबंधीचे मुद्दे पत्रकारांनी उपस्थित केले असता डॉ.विश्वनाथ म्हणाले, जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय मुक्ताईनगरात कार्यरत आहे. त्याला संशोधनासाठी जागा, इमारतीची गरज आहे. या गरजा मुक्ताईनगर येथे पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे कृषी महाविद्यालय जळगावात स्थलांतरीत केले जाणार आहे. विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय कृषी महाविद्यालये कार्यरत आहेत, त्याच धर्तीवर हे महाविद्यालय, असेल, असेही डॉ.विश्नाथ यांनी सांगितले. 
पानवेल उत्पादकांच्या विविध मागण्या
या कार्यक्रमात शेतक:यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात बिगर गुटखा उत्पादनांमध्ये कोरडी पाने समाविष्ट करून त्यासंबंधी पाने विक्रीची संधी शेतक:यांना उपलब्ध व्हावी. पान निर्यातीला चालना मिळावी, पाने तोडण्याची उपकरणे व पान उत्पादकांचे विमे असावेत. प्रशिक्षण कार्यक्रम थेट पानमळ्य़ात व्हावा. रोगराई नियंत्रणाची माहिती कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रांनी व्यापक स्वरुपात संकेतस्थळे, सोशल मीडियावर प्रसारित करावी, पान या पिकाचा समावेश राष्ट्रीय कृषी विकास योजनेत करावा, पान पिकास विमा योजनेत समाविष्ट करावे आदी मागण्या पानवेल उत्पादकांनी केल्या. 
 

Web Title: Apu: This agricultural research will fulfill the dream of doubling agriculture income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.