गिरणा नदीच्या पाण्यात आणखी एक जण बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:41 PM2019-06-30T12:41:46+5:302019-06-30T12:42:15+5:30

चार दिवसातील दुसरी घटना

Another person dies in the water of the Girna River | गिरणा नदीच्या पाण्यात आणखी एक जण बुडाला

गिरणा नदीच्या पाण्यात आणखी एक जण बुडाला

Next

जळगाव - दहीगाव संत ता. पाचोरा येथील गिरणा नदीच्या पाण्यात बुडून बाबूलाल दशरथ पाटील (५४) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या परिसरातील चार दिवसातील ही दुसरी घटना आहे.
बाबूलाल हे आपल्याकडील म्हैस आणि पारडू यांना चारण्यासाठी नदीकाठी घेऊन गेले होते. तिथे म्हैस पाण्यात उतरली. या म्हशीला बाहेर काढण्यासाठी बाबूलाल हे पाण्यात उतरले. खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. गावातील लोकांनी मृतदेह बाहेर काढला. दहीगाव संत येथून जवळच असलेल्या म्हसावद ता. जळगाव येथे २७ रोजी हिरालाल कुंभार याचाही गिरणा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

Web Title: Another person dies in the water of the Girna River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव