अंगणवाडी कर्मचा:यांचा छत्री मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:33 PM2018-03-09T22:33:07+5:302018-03-09T22:33:07+5:30

सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 65 वर्षेच कायम ठेवावी

Anganwadi worker: The umbrella front of | अंगणवाडी कर्मचा:यांचा छत्री मोर्चा

अंगणवाडी कर्मचा:यांचा छत्री मोर्चा

Next
ठळक मुद्दे14 मार्च रोजी मुंबई येथे धरणेघोषणांनी दणाणले शहर
गाव : सेवानिवृत्तीचे वय कमी न करता 65 वर्षेच कायम ठेवावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेवर 9 मार्च रोजी छत्री मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून दुपारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. आंदोलक छत्र्या घेवून सहभागी झाले होते. मोर्चा उद्यानापासून टॉवरकडे नेण्यात आला व तेथून जिल्हा परिषदेकडे वळविला. यावेळी महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आहेत मागण्याअंगणवाडी कर्मचा:यांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 ऐवजी 60 करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील सुमारे 16 हजार कर्मचारी नोकरीला मुकणार आहे. परिणामी त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीचे वय 65 कायम ठेवावे, किंवा अंगणवाडी कर्मचा:यांना 5 वर्षाची नुकसान भरपाई द्यावी. याचबरोबर अंगणवाडी कर्मचा:यांना पेन्शन योजनाही लागू करावी.14 मार्च रोजी मुंबई येथे धरणेशासनाने अंगणवाडी कर्मचा:यांचे निवृत्ती वय 65 वरुन 60 न केल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्यास उच्चन्यायालायात संघटना दाद मागेल असा, इशाराही देण्यात आला आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण पाटील यांच्यासह सुषमा चव्हाण, चेतना गवळी, साधना पाटील, सुनंदा नेरकर, रमा अहिरे, पुष्पा परदेशी, कल्पना जोशी, शोभा जावरे, सविता महाजन, मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, अक्का सपकाळे, आशा जाधव, बेबी पाटील, संगीता निंभोरे, सरला पाटील, शुभांगी बोरसे, उज्ज्वला पाटील, रत्ना सोनवणे, रेखा नेरकर, वंदना कंखरे, सलमा तडवी, नंदा देवरे, सरला कोलते, मिना गढरी, सुलोचना पाटील, सविता वाघ, सुरेखा मोरे, सुनीता नेतकर आदींनी परिश्रम घेतले.घोषणांनी दणाणले शहरअंगणवाडी कर्मचा:यांनी मोर्चा दरम्यान मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी केली. सेवानिवृत्तीचे वय कमी करू नये, दरमहा पेन्शन लागू करावे, बेरोजगार करणा:या सरकारचा धिक्कार असो. आदी घोषणा देण्यात आल्या. याचबरोबर जि.प. जवळ मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी पदधिका:यांनी संघटनेची भूमिका मांडली.

Web Title: Anganwadi worker: The umbrella front of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.