आघाडी-युती आधीच जागावाटपावर तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:26 PM2019-07-22T12:26:03+5:302019-07-22T12:27:47+5:30

राष्टÑवादी ९ तर काँॅग्रेसही ६ जागांवर ठाम ; जळगाव शहर व मुक्ताईनगरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही

The Alliance has already won seats | आघाडी-युती आधीच जागावाटपावर तिढा

आघाडी-युती आधीच जागावाटपावर तिढा

Next

जळगाव : विधानसभेच्या निवडणुकीत कॉग्रेस-राष्टÑवादीची आघाडी होईल की शिवसेना-भाजपाची युती कायम राहील याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, त्याआधीच जिल्ह्यातील ११ विधानसभेच्या जागांबाबत चारही पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.
शुक्रवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेश आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्टÑवादी जिल्ह्यात ९ जागा लढवेल, कॉँग्रेससाठी जळगाव शहर व रावेर या दोन जागा सोडल्या जातील, अशी घोषणा केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुक्ताईनगरच्या जागेवर दावा केला होता. तसेच जळगाव शहराची जागा युतीच्या काळात शिवसेनेकडेच राहिल्याने ही जागा या निवडणुकीतही शिवसेनेकडेच यावी यासाठीही शिवसेना नेते आग्रही आहेत. दरम्यान, जळगाव शहरात व मुक्ताईनगर येथे विद्यमान आमदार भाजपाचे आहेत. अशा परिस्थितीत भाजपा या जागा मित्रपक्षासाठी सोडेल का ? हा प्रश्न असला तरी चारही प्रमुख पक्षांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येत आहे.
चित्रा वाघ यांना आघाडीत बिघाडी करावयाची आहे - पाटील
जिल्ह्यात राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रसने किती जागा लढवायचा याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचे नेते घेत असतात. मात्र, चित्रा वाघ यांनी राष्टÑवादी जिल्ह्यात ९ जागा लढविणार व कॉँग्रेसला केवळ २ जागा देणार हे वक्तव्य केवळ आघाडीत बिघाडी करण्याचा हेतुने केले असून, त्यांना याबाबत कोणताही अधिकार नसल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. २००४ व २००९ मध्ये राष्टÑवादीसोबत युती असताना कॉँग्रेस जळगाव शहर, जामनेर, रावेर व अमळनेर या चार जागांवर निवडणूक लढविली असल्याने आगामी विधानसभेत कॉँग्रेस परंपरागत चार जागांसह आणखीन दोन जागा वाढवून एकूण ६ जागांवर निवडणूक लढविणार असून याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.पाटील यांनी दिली.
अमळनेरच्या जागेच्या बदल्यात चोपड्याची मागणी
आघाडीच्या काळात जिल्ह्यातील अकरा जागांपैकी ७ जागा राष्टÑवादी तर ४ जागा कॉँग्रेस लढले. आता अमळनेरमध्ये भाजपामधून राष्टÑवादीत आलेले अनिल पाटील हे इच्छुक असल्याने त्यांच्यासाठी या जागेवर राष्टÑवादीकडून दावा केला जात आहे. मात्र, या बदल्यात कॉँग्रेसकडूनही चोपड्याची जागा मागितली जात आहे. त्याच्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला २००४-२००९ प्रमाणे राहिल्यास काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
भाजपा-सेनेचाही ६-५ चा फार्म्युला ?
भाजपा व शिवसेनेचा जिल्ह्यात ६ व ५ जागांचा फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला या निवडणुकीत युती झाल्यास कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्यावेळेस शिवसेना व भाजपा विरोधात लढल्याने शिवसेनेची हक्काची जळगाव शहर व भुसावळ या ठिकाणी पराभव झाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती झाल्यास जळगाव शहराची जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून, भुसावळची जागा शिवसेनेला गमवावी लागण्याची शक्यता आहे. तर एरंडोल, पाचोरा, चोपडा व जळगाव ग्रामीणसह जळगाव शहर या पाच जागा सेनेकडे जाण्याची शक्यता आहे.

Web Title: The Alliance has already won seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.