जळगावात सोनपोत चोरटय़ासोबत वृद्धेची झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:27 AM2017-08-08T00:27:48+5:302017-08-08T00:29:12+5:30

शिव कॉलनी परिसरातील घटना : मार्निग वॉक करीत असतानाचा थरार

Aged struggle with sonpot thieves in Jalgaon | जळगावात सोनपोत चोरटय़ासोबत वृद्धेची झटापट

जळगावात सोनपोत चोरटय़ासोबत वृद्धेची झटापट

Next
ठळक मुद्देसीसीटीव्हीत चित्र अस्पष्ट शंभरफुटी रस्त्यावर घडली घटनासकाळी साडे सहा वाजता घराबाहेर पडल्या असता घटना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 7 - मार्निग वॉक करीत असताना लिलाबाई रामदास पाटील (वय 75,रा.शिव कॉलनी) यांच्या गळ्यातील सोनपोत लांबविणा:या चोरटय़ास पकडून त्यास अद्दल घडविण्याचा प्रय} त्यांनी केला. चोरटय़ास पकडलेही मात्र तो धडधाकट असल्याने त्याने लिलाबाई यांना जोरात हिसका देत पळ काढला. लिलाबाई यांनी चोरटय़ास पकडण्यासाठी आरडाओरड केली मात्र आजुबाजुला कुणीही नसल्याने चोरटा हातातून निसटला. 
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लिलाबाई पाटील या शिवकॉलनी येथील कृष्णा मेडिकलच्या शेजारी कुटुंबियांसोबत राहतात. मधुमेह असल्यामुळे त्या दररोज सकाळी घराजवळ असलेल्या शंभरफुटी रस्त्याकडे मोकळ्या जागेत फिरण्यासाठी जातात. सोमवारीही त्या नेहमीप्रमाणे सकाळी साडे सहा वाजता घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली.  
पोत लांबविल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पावणे सात वाजता एक जण लिलाबाई यांचा पाठलाग करताना दिसतो, मात्र त्याचे चित्र व वर्णनही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पोलिसांचीही अडचण झाली आहे. 

 शंभरफुटी रस्त्याकडे जाताना मोकळ्या जागेत सकाळी पावणे सात वाजता त्यांना चोरटय़ाने हाक मारली. लिलाबाई यांनी मागे वळून पाहिले, मात्र त्याकडे लक्ष न देता त्या पुन्हा पुढे जायला लागल्या. त्यानंतर या चोरटय़ाने त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला.  आजूबाजुला जवळपास कोणीच नसल्याची संधी साधत लिलाबाई यांच्या गळ्यातील पोत हिसकावून पळण्याचा प्रय} करीत असताना लिलाबाई यांनी मोठय़ा हिंमतीने चोरटय़ाला पकडले, मात्र धक्का मारुन त्याने तेथून पळ काढला. यावेळी तुटलेली अर्धी पोत गळ्यातच अडकल्याने ती सुरक्षित राहिली. यावेळी लिलाबाई यांनी आरडाओरड केली, मात्र उपयोग झाला नाही.दरम्यान, याप्रकरणी लिलाबाई पाटील यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला आहे.

Web Title: Aged struggle with sonpot thieves in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.