यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कमी गुण मिळाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:06 AM2018-02-15T00:06:47+5:302018-02-15T00:09:11+5:30

जळगावात सीईओंची तंबी

Action taken if fewer points | यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कमी गुण मिळाल्यास कारवाई

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कमी गुण मिळाल्यास कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे कामांची पाहणी करण्यासाठी पथक आज जळगावात

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि. १४ - यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत २०१६-१७मध्ये झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी नंदुरबार येथील पथक १५ रोजी जळगाव येथे येत आहे. यासाठी जि.प.मध्ये सर्व विभागांकडून माहिती गोळा करण्याची लगबग सुरू होती. यामध्ये ज्या विभागाने माहिती दिली नाही व कमी गुण मिळाल्यास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लेखी स्वरुपात सर्व विभागांना दिला आहे.
१५ रोजी सकाळी १० वाजता साने गुरुजी सभागृहात हे पथक येणार असून या वेळी पथकास हवी ती माहिती उपलब्ध करून देण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व विभागांना सूचना दिलेल्या आहे. त्यानुसार सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी जि.प.मध्ये गेल्या आठवड्यापासूनच तयारी सुरू आहे.
जि.प. स्तरावरील सर्व खाते प्रमुखांनी, संबंंधित सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी उपस्थित राहून पथकास हवे ते दप्तर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या आहेत. ज्या विभागाकडून माहिती उपलब्ध न झाल्यास व त्यामुळे मिळालेले गुण कमी असल्यास संबंधितास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, अशी तंबी सीईओंनी दिली आहे.

Web Title: Action taken if fewer points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.