धामणगाव येथील ग्रामसेवक निलंबित, ग्रामनिधीत अपहार केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:05 PM2018-10-12T16:05:54+5:302018-10-12T16:06:53+5:30

ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत दोन लाख ९६ हजार रुपयांचा अपहार, पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे असमाधानकारक कामकाज आणि कार्यालयीन आदेशाची अवमानना या कारणावरून तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.जी.पटवारी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Accused of slashing Gramsevak in Dhamangaon, suspended from village collector | धामणगाव येथील ग्रामसेवक निलंबित, ग्रामनिधीत अपहार केल्याचा आरोप

धामणगाव येथील ग्रामसेवक निलंबित, ग्रामनिधीत अपहार केल्याचा आरोप

Next
ठळक मुद्देचौदाव्या वित्त आयोगातील रकमेत दोन लाख ९६ हजार रुपयांचा कायम अपहारइतर संशयित अपहार, घरकुलांच्या कामकाजात दिरंगाई व असमाधानकारक कामकाज, मुख्यालयाच्या बैठकीत सतत गैरहजर राहण्याचा ठेवलाय ठपका

मुक्ताईनगर, जि.जळगाव : ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत दोन लाख ९६ हजार रुपयांचा अपहार, पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे असमाधानकारक कामकाज आणि कार्यालयीन आदेशाची अवमानना या कारणावरून तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.जी.पटवारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
धामणगाव येथे कायम नियुक्ती व चिंचखेडा खुर्द ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक डी.जी. पटवारी यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाई मागे ग्रामनिधी, पाणीपट्टी व चौदाव्या वित्त आयोगातील रकमेत दोन लाख ९६ हजार रुपयांचा कायम अपहार, इतर संशयित अपहार, घरकुलांच्या कामकाजात दिरंगाई व असमाधानकारक कामकाज, मुख्यालयाच्या बैठकीत सतत गैरहजर राहणे, चौकशी कामी ग्रामपंचायतीचे अभिलेखे उपलब्ध करून देत नाहीत व कार्यालयीन आदेशाची अवमानना करणे आदी प्रमुख कारणे आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम तीनच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निर्दशनास आल्याने गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडे यांनी सदर ग्रामसेवकाचे निलंबन आदेश १० आॅक्टोबर रोजी काढले आहेत.
दरम्यान, घरकुल उद्दिष्टपूर्तीचा विषय पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. घरकुलांच्या कामकाजात ढिसाळपणा व दिरंगाईबाबत आणखी काही ग्रामसेवक कारवाईच्या टप्प्यात येणार असल्याचे कळते.



 

Web Title: Accused of slashing Gramsevak in Dhamangaon, suspended from village collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.