पातोंडा येथील शिक्षकाचा बुडून मृत्यू, पंचायत राज समितीच्या कामकाजामुळे बळी गेल्याचा भावाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:20 PM2017-10-27T13:20:49+5:302017-10-27T13:21:30+5:30

पंचायत राज समिती येणार म्हणून अपूर्ण कामकाज पूर्ण करण्यासाठी संस्थेने सुट्टीतही शाळेत बोलावले

The accused of being killed due to the work of death | पातोंडा येथील शिक्षकाचा बुडून मृत्यू, पंचायत राज समितीच्या कामकाजामुळे बळी गेल्याचा भावाचा आरोप

पातोंडा येथील शिक्षकाचा बुडून मृत्यू, पंचायत राज समितीच्या कामकाजामुळे बळी गेल्याचा भावाचा आरोप

Next
ठळक मुद्देअपूर्ण कामकाज पूर्ण करण्यासाठी संस्थेने सुट्टीतही शाळेत बोलावलेमृतदेहाच्या डोळ्यांवर गॉगल तसाच

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 27 - पातोंडा येथील रहिवाशी व घाडवेल, ता. चोपडा येथे नोकरीस असलेल्या बेपत्ता माध्यमिक शिक्षकाचा खापरखेडा येथे तापी नदी पात्रात 5  दिवसांनी मृतदेह आढळून आला. दरम्यान, पंचायत राज समितीच्या कामकाजामुळे भावाचा बळी गेल्याचा आरोप मयताच्या भावाने केला आहे
 पातोंडा येथील मूळ रहिवासी असलेले भगवान माधवराव शिंदे (52)  हे चोपडा तालुक्यातील घाडवेल येथे निंबा नरसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. सध्या दिवाळीची सुट्टी होती, परंतु पंचायत राज समिती येणार म्हणून अपूर्ण कामकाज पूर्ण करण्यासाठी संस्थेने सुट्टीतही शाळेत बोलावले होते. म्हणून भगवान शिंदे हे दररोज जवळचा मार्ग म्हणून अमळनेर तालुक्याच्या खापरखेडा येथून तापी नदीत उतरून घाडवेल तालुका चोपडा या पलीकडच्या काठावरील गावात शाळेत जात होते. ते 23 रोजी शाळेत गेले तर परत आले नाही. त्यांचा शोध घेतला. अखेर विठ्ठल शिंदे यांनी 23 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद केली. 5 दिवसानंतर नालखेडा येथे सुरतचे तरुण दिवाळी सुटीत पाहुणे आले होते. ते पोहण्यासाठी तापी नदीत आले असता त्यांना नदीत मृतदेह  तरंगताना दिसला. मृतदेहाच्या डोळ्यांवर गॉगल तसाच होता. आजूबाजूच्या गावात माहिती पसरल्यानंतर मयताचे बंधू चंद्रकांत शिंदे यांनी भगवान शिंदे यांचाच मृतदेह असल्याचे ओळखले. मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.   
यावेळी भगवान शिंदे यांचे मोठे भाऊ सुरेश शिंदे यांनी पंचा.त राज समितीच्या  दहशतीमुळे माङया भावाचा बळी गेल्याचा आरोप केला आहे. संस्थेचे सचिव कमलाकर पाटील यांनीही मान्य केले  की  समितीमुळे भगवान शिंदे यांना शाळेत बोलवत होतो. 
 भगवान शिंदे यांची प}ी 6 महिन्यापूर्वीच मयत झाली असून त्यांच्या पश्चात 3 भाऊ 2 मुले 1 मुलगी असा परिवार आहे.

Web Title: The accused of being killed due to the work of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.