भुसावळ येथे ‘रन भुसावल रन’साठी ८०० स्पर्धकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:13 AM2018-12-25T01:13:05+5:302018-12-25T01:14:15+5:30

आरोग्य, शांतता व हिरवळ, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे भुसावळ येथे १३ जानेवारीला ‘रना भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी आतापर्यंत ८०० स्पर्धकांनी नोंदणी केली असून स्पर्धा तीन, पाच व दहा कि.मी.अंतराची राहणार आहे.

800 Runner's Register for 'Run Bhusaval Run' | भुसावळ येथे ‘रन भुसावल रन’साठी ८०० स्पर्धकांची नोंदणी

भुसावळ येथे ‘रन भुसावल रन’साठी ८०० स्पर्धकांची नोंदणी

Next
ठळक मुद्देआरोग्य, शांतता, हिरवळ व स्वच्छतेचा संदेश देणार२२५ स्पर्धकांची आॅनलाइन, तर ५७५ स्पर्धकांची आॅफलाइन नोंदणी पूर्ण

भुसावळ, जि.जळगाव : आरोग्य, शांतता व हिरवळ, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे भुसावळ येथे १३ जानेवारीला ‘रना भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी आतापर्यंत ८०० स्पर्धकांनी नोंदणी केली असून स्पर्धा तीन, पाच व दहा कि.मी.अंतराची राहणार आहे.
स्पर्धेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून होणार असल्याची माहिती गजानन राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, उपस्थित होते.
स्पर्धकांना टी-शर्ट, गुडी बॅग, मेडल, प्रमाणपत्र फराळ व आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे, डॉ.उल्हास पाटील, उद्योगपती मनोज बियाणी आदींचे सहकार्य मिळत आहे. स्पर्धकाचे नाव नोंदणी आॅनलाइन संकेतस्थळावर सुरू आहे. २२५ स्पर्धकांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, ५७५ स्पर्धकांनी आॅफलाईन नोंदणी आतापर्यंत केलेली आहे. ३० डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. यतीन ढाके, जयेंद्र लेकुरवाळे, क्रीडा शिक्षक रमण भोळे, रवी निमाणी, शुभम महाजन, वरुण इंगळे, पूनम भंगाळे, डॉ.संजय नेहते, प्रवीण वारके, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: 800 Runner's Register for 'Run Bhusaval Run'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.