७२ तासांत ५१ हजार बॅनर्स, पोस्टर्स हटवले!

By अमित महाबळ | Published: March 21, 2024 04:02 PM2024-03-21T16:02:45+5:302024-03-21T16:03:18+5:30

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा दि. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे.

51 thousand banners, posters removed in 72 hours | ७२ तासांत ५१ हजार बॅनर्स, पोस्टर्स हटवले!

७२ तासांत ५१ हजार बॅनर्स, पोस्टर्स हटवले!

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली असून, जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून ७२ तासांत ५१ हजारपेक्षा अधिक बॅनर्स, पोस्टर्स प्रशासनाने हटवले आहेत. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा दि. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रात ३१ हजार ५६२ तर रावेर लोकसभा मतदारसंघात २० हजार १६६ विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत. कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे.

दोन मतदारसंघात फलकांचा महापूर आवरला...
आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर २४ तासांत जळगाव लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या जळगाव शहरातून ५५, जळगाव ग्रामीण मतदार संघातून २३४७, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून ४०७, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून २९१,  चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून २५१७, पाचोरा विधानसभा मतदारसंघातून २४४५ असे एकूण ८०६२ बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्यासोबतच कोनशीला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली. 

रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून १५९६, रावेर विधानसभा मतदारसंघातून ८३१, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ५८६, जामनेर विधानसभा मतदारसंघातून २९३१, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून ४२, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ९८४ असे एकूण ६,९३४ बॅनर्स, झेंडे,पोस्टर्स तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
 

Web Title: 51 thousand banners, posters removed in 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.